Home | International | Pakistan | david-headly-dairy-pakistan-major-names

हेडलीच्या डायरीत पाकिस्तानातील अधिकाऱयांची नावे

वृत्तसंस्था | Update - May 25, 2011, 11:06 AM IST

मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या डायरीमध्ये पाकिस्तानी लष्करातील मेजर श्रेणीतील दोन अधिकाऱयांचे दूरध्वनी क्रमांक मिळाले आहेत.

  • david-headly-dairy-pakistan-major-names

    शिकागो - मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या डायरीमध्ये पाकिस्तानी लष्करातील मेजर श्रेणीतील दोन अधिकाऱयांचे दूरध्वनी क्रमांक मिळाले आहेत.

    पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि तेथील दहशतवादी संघटना जमात-उद-दवा यांच्यामध्ये संबंध असल्याचे या डायरीमुळे स्पष्ट झाले आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी मदत करणाऱया अन्य काही व्यक्तींचे दूरध्वनी क्रमांकही हेडलीच्या डायरीत मिळाले आहेत.

    मुंबईवरील हल्ल्यात आपला हात होता, अशी कबुली डेव्हिड हेडलीने याआधीच शिकागोमधील न्यायालयात दिली आहे. तो आता त्याचा साथीदार तहावूर हुसेन राणा याच्याविरोधात साक्ष देत आहे.

Trending