आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थशास्त्रज्ञाने म्हटले घाबरू नका, त्यानंतर अमेरिकेत बँक बुडाली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

62 वर्षीय डेव्हिड मालपास अमेरिकेतील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ अाहेत. ते बाजारासंदर्भात भविष्य वर्तवतात. २००७ मध्ये अमेरिकेतील वाॅल स्ट्रीट जर्नलमध्ये क्रेडिट मार्केटमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर एक लेख लिहिला. त्यात त्यांनी गुंतवणूकदारांना न घाबरण्याचा सल्ला दिला. त्यांनी लिहिले हाेते, ‘हाउसिंग व डेट मार्केट अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा खूप माेठा भाग नाही. त्याचा अर्थव्यवस्थेवर काही परिणाम हाेणार नाही. त्यानंतर २००८ मध्ये अालेल्या मंदीत अमेरिकेतील सर्वात माेठी गुंतवणूकदार बँक बिअर स्टर्न्स डबघाईस अाली. त्यामुळे डेव्हिड यांच्या समजुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण हाेऊ लागले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांच चांगले संबंध अाहेत. वाॅल स्ट्रीट जर्नल व फाेर्ब्जमध्ये ते नियमित लिखाण करतात. 

  
डेव्हिड सध्या अमेरिकेतील ट्रेझरी विभागात अपर सचिव असल्याने आंतरराष्ट्रीय प्रकरणे पाहतात. मे २००१६ मध्ये ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेत वरिष्ठ अर्थ सल्लागाराची भूमिका त्यांनी पार पाडली. यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या कार्यकाळात ते उपसहायक अर्थमंत्री तर माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या कार्यकाळात उपसहायक परराष्ट्रमंत्री राहिले अाहेत. जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कामकाज व व्यावसायिक माॅडेलवर ते टीका करत राहिले अाहेत. डेव्हिड यांच्या मतानुसार जागतिक बँक मनमानी पद्धतीने जगभरात कर्ज वाटप करत अाहे.   डेव्हिड मालपास यांचा अनुभव चांगला अाहे. कोलोरॅडो कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी डेन्व्हर विद्यापीठातून एमबीए केले. जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या स्कूल अाॅफ फाॅरेन सर्व्हिसमध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची पदवी घेतली. 

न्यूयाॅर्कमध्ये एका मॅक्राेइकाेनाॅमिक्स रिसर्च फॉर्मची त्यांनी स्थापना केली. त्यांना इंग्रजीसह स्पॅनिश, रशियन, फ्रेंच भाषा येतात. डेव्हिड यांची पत्नी एडिले मालपास यासुद्धा डेव्हिड यांच्यासारख्या रिपब्लिकन पक्षाच्या समर्थक अाहेत. त्या मॅनहटन रिपब्लिकन पार्टीच्या चेअरवुमन हाेत्या. एडिले यांचे वडील हरमन ओबेरमेयर अमेरिकेतील प्रसिद्ध पत्रकार, राजकीय विश्लेषक व प्रकाशक अाहेत. सध्या ते शिकागो बेस्ट पॉलिटिकल न्यूज व डेटा फर्म ‘रिअल क्लिअर पॉलिटिक्स’ मध्ये नॅशनल पॉलिटिकल रिपोर्टर अाहेत.


जन्म- ८ मार्च १९५६  
शिक्षण- इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (जॉर्जटाऊन विद्यापीठ)  
चर्चेत का? - जागतिक बँकेचे अध्यक्ष होऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नामनिर्देशन केले. 

बातम्या आणखी आहेत...