आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • David Warner Believes That Rohit Sharma Could Break Brian Lara's 400 run Test Record:

'हा' भारतीय फलंदाज ब्रायन लाराचा कसोटीतील 400 धावांचा विक्रम मोडू शकतो : डेव्हिड वॉर्नर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या मते भारतीय फलंदाज रोहित शर्मा वेस्टइंडीजच्या ब्रायन लाराचा कसोटीतील सर्वाधिक 400 धावांचा विक्रम मोडू शकतो. एडिलेड कसोटी सामन्यात तो स्वतः या विक्रमाच्या जवळ पोहोचला होता. मात्र कर्णधार टिम पेनने डाव घोषित केल्यामुळे तो या विक्रमाला गवसणी घालू शकला नाही. 
कर्णधार पेनने डाव घोषित केला तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाची स्कोर 3 गडी बाद 589 धावा होता. वॉर्नर 335 धावांवर नाबाद खेळत होता. वेस्टइंडीजचा फलंदाज लाराने एप्रिल 2004 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना एंटीगा मैदानावर हा पराक्रम केला होता. 


ब्रायन लाराने 15 वर्षांपूर्वी केला होता नाबाद 400 धावांचा विक्
रम


ब्रायन लाराने एप्रिल 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 582 चेंडूत 400* धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 68.72 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. तर वॉर्नर लाराच्या तुलनेत अधिक गतीने धावा करत होता. ऑस्ट्रेलिया संघाचा डाव घोषित करतेवेळी वॉर्नर 418 चेंडूत 80.14 च्या स्ट्राइक रेटने 335* धावा केल्या होत्या.

कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माचा विक्रम 

रोहित शर्माने आतापर्यंत 32 कसोटी सामन्यांत 46.54 च्या सरासरीने 2141 आणि 218 एकदिवसीय सामन्यात 48.52 च्या सरासरीने 8686 धावा केल्या आहेत. रोहितने यावर्षी रांची कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना पहिले द्विशतक झळकावले होते. तर त्याने एकदिवसीय सामन्यान आतापर्यंत तीन द्विशतके ठोकली आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याची 364 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे हा विक्रम केला होता.  


सेहवागने माझा आत्मविश्वास वाढवला -  वॉर
्नर


ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या कसोटी कारकिर्दीविषयी एक मोठा खुलासा केला. मला कधी कसोटी क्रिकेट खेळता येईल असे वाटले नव्हते. मात्र आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्स संघाकडून खेळताना वीरेंद्र सेहवागने माझा विचार बदलला. 
 

बातम्या आणखी आहेत...