आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदचा सहकारी मिर्चीला कर्ज दिले, डीएचएफएलच्या ठिकाणांवर छापे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा एकेकाळचा सहकारी इकबाल मिर्ची याच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शनिवारी डीएचएफलसह (दिवान हाऊसिंग फायनान्स कॉर्प लि.) इतर कंपन्यांच्या १४ ठिकाणांवर छापे टाकले. मुंबई व परिसरात ही कारवाई करण्यात आली. 
मिर्चीच्या सबलिंक रिअल इस्टेटशी डीएचएफलचे कथित व्यावहारिक संबंध असल्याच्या संशयावरून या काळात इकबाल मिर्चीशी झालेल्या आर्थिक व्यवहारावर ईडीने लक्ष केंद्रित केले आहे. डीएचएफएलने या रिअल इस्टेट कंपनीला २,१८६ कोटी रुपये कर्ज दिले होते. हा पैसा सबलिंक कंपनीने मिर्ची आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या खात्यात पोहोचवल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणी सखोल तपासासाठी संबंधित दस्तऐवज आणि इतर काही पुराव्यांची ईडी शहानिशा करत आहे. 

या व्यवहाराशी आपला काहीही संबंध नसल्याचे डीएचएफएलने म्हटले होते. मात्र, मिर्ची याच्या काही साथीदारांना ईडीने अटक केल्यानंतर मनी लाँडरिंगचे हे प्रकरण अधिक तापले. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची शुक्रवारी चौकशी केली होती. मिर्ची याचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले होते. नंतरच्या काळात त्याच्या कुटुंबीयांशी मालमत्तेसंबंधी व्यवहार केल्याचा पटेल यांच्यावर आरोप आहे. मात्र, पटेल यांनी या प्रकरणात स्पष्ट इन्कार केला आहे.
 

दाऊदचा उजवा हात...
मादक पदार्थांची तस्करी आणि वसुलीच्या गुन्ह्यांमध्ये मिर्ची हा दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानला जात होता. अनेक प्रकरणांत मिर्ची याचे नाव आल्यानंतर पोलिसांचीही त्याच्या व्यवहारांवर करडी नजर होती.