आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिस चषक जगातील सर्वात मोठी टीम टुर्नामेंट; कारण : 119 वर्षांपूर्वी दोन संघ सहभागी; आता 133 संघांना संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- डेव्हिस कपला टेनिसचा वर्ल्डकप मानले जातो. या स्पर्धेत जगभरातील अव्वल दर्जाचे पुरुष खेळाडू सहभागी होतात. हे खेळाडू सातत्याने आपले काैशल्य पणास लावतात. या जागतिक स्तरावरील स्पर्धेला ११९ वर्षांपूर्वी सुरुवात झाली. सुरुवातीला या पहिल्या स्पर्धेत अमेरिका आणि इंग्लंड हे दोनच संघ सहभागी झाले होते. आता या स्पर्धेला जागतिक स्तरावर मोठी लोकप्रियता लाभली. त्यामुळेच आजच्या घडीला या स्पर्धेत १३३ संघ सहभागी होतात.   

शुक्रवारपासून या स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली. नोव्हेंबरमध्ये या प्रतिष्ठेच्या डेव्हिस चषकाचा मानकरी संघ ठरणार आहे. या चषक विजेत्या टीमला १७ कोटींचे बक्षीस देऊन गाैैरवण्यात येईल. या पात्रता फेरीमध्ये २४ संघ सहभागी झाले आहेत.   

 

बक्षिसे १९५ कोटी रुपये; १२८ कोटी संघांना व ६४ कोटी फेडरेशनला  
या विश्वचषकाची १९५ कोटी बक्षीस रक्कम आहे. यातील १२८ कोटी संघांना दिले जातात. तर, ६४ कोटींची रक्कम फेडरेशनच्या नावे होते. चॅम्पियन टीम १७ कोटीच्या बक्षिसांची मानकरी ठरते.  फेडरेशनला ७ कोटी रुपये मिळतात. उपविजेत्याला १२ कोटी व फेडरेशनला ६ कोटी दिले जातात. 
 
सेप्पीची रामकुमारवर सहज मात 
इटलीच्या आंद्रे सेप्पीने एकेरीच्या सलामी सामन्यात सहज विजयश्री खेचून आणली. त्याने सरळ दोन सेटमध्ये रामनाथन रामकुमारचा पराभव केला. त्याने ६-४, ६-२  ने सामना जिंकला.    

गुणेश्वरनची झुंज अपयशी 
भारताच्या प्रजनेश गुणेश्वरनची झुंज अपयशी ठरली. त्यालाही  पराभवाला सामोरे जावे लागले. इटलीच्या बेरेटिनीने आक्रमक सर्व्हिस करत सामना जिंकला. त्याने ६-४, ६-३  ने विजयश्री खेचून आणली.  

 

विद्यापीठ टीमने सुचवली कल्पना; टीममधील इवाइट डेव्हिसच्या नावाने स्पर्धेचे आयोजन  
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या टेनिस टीमने अशा प्रकारच्या सांघिक इव्हेंटच्या आयोजनाची कल्पना सुचवली. यावर एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या टीममधील सहभागी खेळाडू इवाइट डेव्हिसच्या नावानेच  आयोजनाला सुरुवात झाली.  त्यानेच या स्पर्धेचा फॉरमॅट तयार केला.  त्याने विजेत्या टीमला देण्यासाठीची ट्रॉफीही स्वत:च विकत घेतली. त्यामुळे याच नावाने या चषकाला सुरुवात करण्यात आली.   सुरुवात १९०० मध्ये झाली. या सत्राच्या स्पर्धेत अमेरिका व इंग्लंड ह संघ सहभागी झाले होते.

 

फॉरमॅट : फायनल्समध्ये १८ संघ, यातील १२ संघांचा पात्रता फेरीतून प्रवेश
डेव्हिस चषकात दरवर्षी १३० पेक्षा अधिक संघ सहभागी होतात. याचा फॉरमॅट अधिकच कठीण आहे. स्पर्धेच्या फायनल्समध्ये १८ संघ सहभागी होतात. म्हणजेच १८ टीमकडे चॅम्पियन होण्याची संधी असते. यातील १२ टीम पात्रता फेरीतून प्रवेश करतात, तर चार संघ हे गतवर्षीचे सेमीफायनलिस्ट असतात.   


पात्रता फेरीचा फॉरमॅट
पात्रता फेरीत २४ संघ. यात ४ संघ हे गतवर्षीचे क्वार्टर फायनलमधील पराभूत संघ असतात. तसेच ८ संघ हे वर्ल्ड ग्रुप प्लेऑफचे गत सत्रातील विजेते आणि १२ संघ आपापल्या झोनमधील सर्वोत्कृष्ट रँकिंगचे असतात. हे १२ संघ तीन झोनमधून सहभागी होतात. सहा संघांना युरोप/आफ्रिका, ३ आशिया/ओशियाना व ३ अमेरिकन झोनमधून प्रवेश दिला जातो. 

 

हेही महत्त्वाचे
- ऑस्ट्रेलियाचा रॉय इमर्सन सर्वात यशस्वी खेळाडू, त्याच्या नावे सर्वाधिक ८ किताब.  
- ऑस्ट्रेलियाचा होपमॅन सर्वात यशस्वी कर्णधार. त्याच्या नेतृत्वात टीम १६ वेळा चॅम्पियन.  
- सॅन मेरिनोचा  १३ वर्षे ३१९ दिवसांचा रोसी हा डेव्हिस चषक खेळणारा सर्वात युवा आणि सॅन मेरिनोचाच व्हिक्टोरिया पेलेंड्रा (६६ वर्षे १०४ दिवस) सर्वात वयस्कर.

 

भारतीय संघ ३ वेळा उपविजेता 
भारताने १९२४ मध्ये पहिल्यांदा  सहभाग घेतला. भारताने तीन वेळा उपविजेतेपद पटकावले. १९६६, १९७४ व १९८७ मध्ये भारताने फायनल गाठली. मात्र, तिन्ही वेळा  विजय मिळाला  नाही.  १९६६ मध्ये ऑस्ट्रेलियाने ४-१ ने, १९८७ मध्ये स्वीडनने ५-० ने भारतावर मात केली. १९७४ मध्ये वर्णभेदामुळे आफ्रिका संघाविरुद्धचा अंतिम सामना होऊ शकला नाही. भारताने याच वादामुळे हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आफ्रिका संघाला विजयी घोषित करण्यात आले. 

 

पेसच्या नावे दुहेरी विक्रम   
भारताचा ४५ वर्षीय लिएंडर पेसच्या नावे दुहेरी विक्रमाची नोंद आहे. पेस हा सर्वाधिक २८ वर्षांपर्यंत ही स्पर्धा खेळणारा एकमेव. त्याने १९९० ते २०१८ पर्यंत सहभाग नोंदवला.  तो दुहेरीत सर्वाधिक ४३ सामनेे जिंकणारा एकमेव.
 

बातम्या आणखी आहेत...