आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊद इब्राहीमच्या भावाला बिर्याणी खाऊ घालणा-या \'त्या\' 5 पोलिसांचे निलंबन; पोलिस आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ठाणे तुरुंगात कैद असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे पोलिस आयुक्त विवेक फन्सळकर यांनी पोलिस उप-निरीक्षकासह 4 पोलिस कॉन्स्टेबलला सस्पेंड केले. तसेच त्या सर्वांच्या विरोधात चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, नुकतेच इकबाल कासकरला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी कास्कर एका कारमध्ये बसून बिर्याणी खात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्याच प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. इकबाल कास्करला खंडणीच्या एका प्रकरणात एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी अटक केली होती. 

 

भारतातील मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इकबाल कासकरला वैद्यकीय उपचाराच्या नावे VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचे वृत्त एका माध्यमाने दिले होते. रुग्णालय परिसरात कास्कर एका गाडीमध्ये बसून बिर्याणीवर ताव मारताना सिगारेट ओढत फोनवर बोलतानाचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला होता. याच दरम्यान कासकरला कथितरित्या त्याच्या पंटरांची भेट घेण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी काही पोलिस कर्मचाऱ्यांनी लाच घेतली असा आरोपही झाला. या प्रकरणात अंतर्गत चौकशीचे आदेश देताना रोहिदास डोंगर पवार (पोलिस उप-निरीक्षक), पुंडलिक रामचंद्र काकडे (पोलिस काँस्टेबल), विजय नवल हालोर (पोलिस शिपाई), कुमार हनुमंत पुजारी (पोलिस शिपाई), सूरज पांडुरंग मनवर (पोलिस शिपाई) यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर 1981 च्या कलम 68 अंतर्गत कारवाई करण्यात आली. 

 

बातम्या आणखी आहेत...