आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराचीत गँग्सटर फारुकची गोळ्या झाडून हत्या; दाऊद इब्राहीमला ठार मारण्याचा रचला होता कट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारताचा मोस्ट दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहीमचा हस्तक राहिलेल्या गँगस्टर फारुकची कराचीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. फारुक देवडीवाला याने दाऊदला ठार मारण्याचा कट रचला होता. त्याला रोखण्यासाठी दाऊदचा आणखी एक जवळिक छोटा शकीलने फारुकची हत्या केली असे वृत्त आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षीच दुबईमध्ये फारुकला अटक केली होती. परंतु, दुबईतून भारतात आणण्यात यश आले नाही. यानंतर आता त्याचा पाकिस्तानात खून झाल्याचे वृत्त समोर आले आहे.


इंडियन मुजाहिद्दीनसाठी दहशतवाद्यांची भरती करायचा फारुक
भारतीय तपास संस्था अनेक गंभीर प्रकरणांमध्ये फारुकचा शोध घेत होत्या. त्याने दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनसाठी दहशतवाद्यांची भरती केली होती. जुलै 2018 मध्ये बनावट कागदपत्रांच्या आरोपात पाकिस्तानने त्याचे दुबईहून कराचीत प्रत्यर्पण करून घेतले. या बनावट कागदपत्रांमध्ये फारुककडे पाकिस्तानी पासपोर्ट आणि पाकिस्तानी नागरिक असल्याचे पुरावे होते.


पाकमध्ये ठार झालेला दाउदचा दुसरा सहकारी!
सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी दुबईत फारुकसोबत चर्चा केली आणि दाऊदला ठार मारण्याचा कट रचण्यात आला असा संशय छोटा शकीलला होता. शकीलने फारुककडून सत्य काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर फारुकवर विश्वास ठेवता येणार नाही असे दाउद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ठरवले होते. तेव्हाच फारुकला ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कुठल्याही प्रकारच्या माहितीला अधिकृत दुजोरा दिला नाही. तर इंटरपोल त्याच्या हत्येची माहिती जारी करण्यापूर्वी पुरावे गोळा करत आहे. फारुकच्या हत्येच्या वृत्तास अधिकृत दुजोरा मिळाला तर पाकमध्ये ठार झालेला तो दाउदचा दुसरा सहकारी ठरेल. यापूर्वी 2000 मध्ये दाउदचा एक सहकारी फिरोज कोकनी ठार मारला गेला. त्याने दाऊदला दगा देण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले जात आहे.


मूळचा मुंबईचा होता फारुक
फारुक मूळचा मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील रहिवासी होता. तो भारताची दहशतवाद विरोधी एजंसी एटीएसच्या रडारवर होता. गोधरा दंगलीनंतर गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री हरेन पंड्या आणि इतर लोकांच्या हत्येमध्ये त्याचे नाव समोर आले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, यानंतर तो कट्टरपंथियांच्या संपर्कात आला आणि भारतात हल्ले करण्यासाठी युवकांची भरती सुरू केली. सोबतच त्यांना प्रशिक्षण सुद्धा देण्यास सुरुवात केली.

 

बातम्या आणखी आहेत...