आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या कायद्याने दाऊद, हाफिज, मसूद अजहर अतिरेकी जाहीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात दहशतवाद पसरवणारे मौलाना मसूद अजहर, हाफिज मोहंमद सईद, झकी उर रहमान लखवी आणि दाऊद इब्राहिम यांना केंद्र सरकारने दहशतवादी जाहीर केले आहे. गृह मंत्रालयाने बुधवारी बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) दुरुस्ती कायदा, १९६७ च्या अंतर्गत याबाबत अधिसूचना काढली. 

मौलाना मसूद अजहर जैश ए मोहंमदचा प्रमुख असून तो पाकिस्तानातून आपल्या कारवाया करत असतो. २००१ मध्ये जम्मू - काश्मीर विधानसभा, २००१ मध्ये संसद भवन, २०१६ मध्ये पठाणकोट एअरबेस, २०१७मध्ये श्रीनगरमध्ये बीएसएफ तळ, याच वर्षी फेब्रुवारीत पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यातील बसवर झालेल्या हल्ल्यात त्याचा हात आहे. 

दिल्लीतील पोटा न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे. लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईददेखील पाकिस्तानातून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणतो. २००० मध्ये लाल किल्ला, २००८मध्ये उत्तरप्रदेशातील रामपूर येथे सीआरपीएफ छावणीवर आणि २०१५ मध्ये जम्मू-काश्मिरातील उधमपूर येथील बीएसएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा हात होता. अंडर वर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमवर अनेक आरोप आहेत. आतंकवादी हल्ल्याचे षडयंत्र रचने, धार्मिक कट्टरवाद वाढवणे, शस्त्रांची तस्करी, मनी लाँडरिंग, अमली पदार्थांची तस्करी अशा त्याच्या कारवाया आहेत. मुंबईत १९९३ मध्ये अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात २५ लोक मारले गेले होते. हे बॉम्बस्फोट दाऊदने घडवून आणले होते. त्याने अनेकांचे खूनही केले अाहेत.

जकी उर रहेमानचे संबंध लष्कर ए तोयबाशी असून मुंबई हल्ल्याचा आरोपी आहे. लाल किल्ला, रामपूरमध्ये सीआरपीएफ तळ, २००० मध्ये मुंबई आणि २०१५ मधील उधमपूर येथे बीएसएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता.
 

संयुक्त राष्ट्राकडून चौघांची नावे पूर्वीच जाहीर 
कोणत्याही व्यक्तीला दहशतवादी घोषीत करण्याचा अधिकार देणारा कायदा गेल्या महिन्यात लागू करण्यात आला होता. या अंतर्गत अतिरेकी म्हणून जाहीर होणारे हे चार पहिले व्यक्ती आहेत. मंत्रालयाने आपल्या आदेशात यांच्या दहशतवादी कारवायांची माहिती दिली आहे. या चौघांना संयुक्त राष्ट्र संघाने देखील जागतिक दहशतवादी जाहीर केले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...