आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माजी सहकारी शकील अहमद शेख ऊर्फ लम्बू शकील याचे सोमवारी जसलोक हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मागील अनेक महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. 1993 मध्ये मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्फोट, स्फोटकांच्या स्मगलिंगमध्ये लम्बू शकीलचा सहभाग होता.
शकील अहमद शेखला आला होता हार्ट अटॅक
हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की, हार्ट अटॅक आल्याने शकील अहमदचे निधन झाले. गुन्हे क्षेत्रात शेख याची मुंबईत लम्बू शकील या नावाने ओळख होती.
दाऊद इब्राहिमवरही आरोप
दाऊद इब्राहिम हा 1993 मधील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. याशिवाय त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. दाऊद इब्राहिम याने भारतातून पलायन केले आहे. तो सध्या पाकिस्तानातील कराची शहरात राहतो. दाऊद इब्राहिम ग्लोबल टेरेरिस्ट घोषित करण्यात आले आहे.
भारत सरकारने 2006 मध्ये पाकिस्तानला 38 वॉन्टेड गुन्हेगारांची यादी दिली होती. त्यात दाऊद इब्राहिमचाही समावेश होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.