आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांपासून दाउदचा कुणालाच फोन नाही, पाकमध्येच असल्याचे सबळ पुरावे -दिल्ली पोलिस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुख्यात डॉन दाउद इब्राहिमचा अड्डा अजुनही कराची शहर
  • 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट घडवून पळाला होता दाउद

नवी दिल्ली - भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि इंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहीम गेल्या 3 वर्षांत कुणाशीही फोनवर बोलला नाही. संरक्षणाच्या बाबतीत हल्ली तो खूप सतर्क झाला आहे. वृत्तसंस्थेला दिल्ली पोलिसातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दाउद आपल्या सहकाऱ्यांसोबत अजुनही पाकिस्तानात लपून बसल्याचे सबळ पुरावे आहेत. दिल्ली पोलिसांनी त्याचे नोव्हेंबर 2016 पासूनचे कॉल रेकॉर्ड तपासले होते. 1993 मध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून दाउद इब्राहीम मुंबई सोडून पळाला होता.

दाऊदचा अड्डा अजुनही कराचीच

भारतीय तपास संस्थांनी तीन वर्षांपूर्वी दाउदचे 15 मिनिटांचे फोन रेकॉर्ड केले होते. त्यावेळी दाउद आपल्या दुबईतील सहकाऱ्यांशी फोनवर बोलत होता. तेव्हा तो आजारी असून कराचीतील एका रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले जात होते. परंतु, त्याचा भाऊ अनिस इब्राहिमने हा दावा फेटाळला होता. दिल्ली पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, "दाउद फोनचा वापर करण्यापासून वाचत असेल. फोन वापरत नसला तरीही त्याने आपले ठिकाण बदलले नाही. कराची अजुनही त्याचा अड्डा आहे. आमच्याकडे यासंदर्भातील सबळ पुरावे आहेत. त्याच्याच गोटातील सदस्य पाकिस्तानातून षडयंत्र रचत आहेत."

बातम्या आणखी आहेत...