• Home
  • TV Guide
  • Daya Ben Return On Show Good News For Tarak Mehta Ka Oolta Chashma Fans

'तारक मेहता...'मधील सर्वात / 'तारक मेहता...'मधील सर्वात फेमस व्यक्तिरेखा दयाबेनचे होत आहे पुनरागमन, या खास कारणामुळे वर्षभरापासून शोमधून होती गायब

दिव्य मराठी वेब टीम

Sep 08,2018 03:12:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्कः सब टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दयाबेनची भूमिका साकारणा-या दिशा वकानीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिशा मॅटर्निटी लिव्हनंतर आता शोमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार आहे. दिशा गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून या मालिकेत दिसली नाही. टीओआयमध्ये आलेल्या वृत्तानुसार, दिशा पुढील दोन महिन्यांत शोमध्ये कमबॅक करु शकते.


गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दिला मुलीला जन्म...

- दिशा गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून मॅटर्निटी लिव्हवर होती. 30 नोव्हेंबर 2017 रोजी तिने मुलीला जन्म दिला. बातमी होती की, ती आता या शोमध्ये पुन्हा परतणार नाही. पण तिने काही काळासाठी शोमध्ये कमबॅक केले होते.

- सूत्रांच्या माहितीनुसार, मुलीच्या जन्माला काही महिनेच झाले असल्याने दिशाने निर्मात्यांना तिची मॅटर्निटी लिव्ह वाढवण्याची विनंती केली होती. दिशाने स्वतः अनेकदा इंस्टाग्रामवर पोस्ट करुन ती शोला मिस करत असल्याचे अनेकदा म्हटले आहे. पण खासगी आयुष्यामुळे तिला शोमध्ये लवकर कमबॅक करणे शक्य नव्हते. पण आता दिशा मालिकेत पुनरागमन करण्यास तयार आहे.

- टाइम्स ऑफ इंडियाशी केलेल्या बातचितमध्ये शोचे निर्माते असित मोदी यांनी सांगितले की, होय आम्ही दिशाच्या कमबॅकसाठी तिच्याशी बोलणे करत आहे. सगळे जुळून आल्यास, पुढील दोन महिन्यांत ती मालिकेत प्रेक्षकांना दिसेल.

डॉ. हाथीच्या व्यक्तिरेखेसाठी झाली अभिनेत्याची निवड...

दयाबेनशिवाय मालिकेत आणखी एक नवीन कलाकार जुळणार आहे. डॉ. हाथीची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांच्या निधनानंतर निर्माते या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्याच्या शोधात होते. आता त्यांचा शोध पूर्ण झाला आहे. कवी कुमार आझाद यांची भूमिका आता निर्मल सोनी साकारणार आहेत. त्यांनी शोमध्ये कवी कुमार यांच्यापूर्वी डॉ. हाथीची व्यक्तिरेखा साकारली होती.

X
COMMENT