आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच परत येत आहे दिशा वाकाणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेन म्हणजेच दिशा वाकाणीच्या परतण्याबद्दल चर्चा पुन्हा सुरु झाली. 2 वर्षे शोपासून दूर राहिल्यानंतर दिशा वाकाणी नवरात्री स्पेशल ट्रॅकसोबत परत येत आहे. रिपोर्ट्समध्ये सांगितल्यानुसार, ती परत येण्यामागे जेठालाल म्हणजेच दिलीप जोशीचे मोठे योगदान आहे.

हा आहे दयाबेनच्या परतीचा प्लॅन... 
स्पॉटबॉयच्या बातमीनुसार, शोच्या एका येणाऱ्या भागात जेठालाल देवीसमोर दया वरत येणीपर्यंत गरबा  न खेळण्याची प्रतिज्ञा करतो. सर्व सोसायटी मेंबर्स दयाला शोधू लागतात. जेव्हा ते सर्व निराशा होतात, तेव्हा दयाची धमाकेदार एंट्री होते. मेकर्स दयाच्या एंट्रीला जास्तीत जास्त किचकट बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.  

 

असित मोदीने केली अधिकृत घोषणा
काही दिवसांपूर्वी प्रोड्यूसर असित मोदीने दिशाच्या परतण्याच्या बातमीची अधिकृत घोषणा केली. एका न्यूज वेबसाइटने सांगितले, "दिशा दया म्हणून परतणार आहे. यामध्ये एका महिन्याचा वेळ लागणार आहे. आम्ही परत परत तिला शोमध्ये येण्याचा आग्रह करत होतो, पण ती मुलगी लहान असल्याने तयार होत नव्हती.

सप्टेंबर 2017 पासून शोपासून दूर आहे दिशा... 
दिशा सप्टेंबर 2017 मध्ये मॅटर्निटी लीव्हवर गेली होती. नोव्हेंबर 2017 मध्ये तिने मुलीला जन्म दिला, दोन वर्षांनंतरही प्रेक्षक ती परतण्याची वाट पाहात आहेत. मध्यंतरी अशा बातम्या आल्या होत्या की, दिशाचा पती मयूर पढियाने दिशाला दिवसातून फक्त 4 तास आणि महिन्यामध्ये केवळ 15 दिवस कामाची अट ठेवली होती.