आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे फक्त 10 हजार रुपये देऊन मिळतेय स्वतःचे घर, ऑनलाइन करु शकता बुकिंग 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली. लोकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) पुन्हा एकदा नवीन योजना घेऊन आले आहे. या योजनेनुसार DAA जुन्या स्कीममधून विक्री न झालेले घर पुन्हा विक्रीसाठी काढले आहेत. यामध्ये दिल्लीच्या विविध विभागांमधील जनता फ्लॅट आणि 1 BHK फ्लॅटचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे फ्लॅट्स ऑनलाइन बुक केले जाऊ शकतात. 


जे पहिले येईल त्याचे होईल बुकिंग 
DDA ने या फ्लॅट्सच्या बुकिंगसाठी ऑनलाइन सुविधा प्रदान केली आहे. DDA कडून दिलेल्या माहितीनुसार, या फ्लॅट्सची बुकिंग कोणत्याही उत्पन्न गटातील व्यक्ती करु शकतो. या योजनेनुसार जे पहिले येईल त्याची बुकिंग केली जाईल. सर्व फ्लॅट्सची बुकिंग www.dda.org.in च्या माध्यमातून ऑनलाइन केली जात आहे. DDA च्या माध्यमातून ज्या फ्लॅट्सची विक्री केली जात आहेत ते नरेला, रामगढ आणि सिरसपुरमध्ये उपलब्ध आहेत. डीडीएनुसार, जनता फ्लॅटची बुकिंग 10 हजार रुपये आणि 1 BHK फ्लॅटची बुकिंग 15 हजार रुपये देऊन केली जाऊ शकते. इतर पैसे तीन महिन्यांनंतर दिले जाऊ शकतात. 
 

पुढे वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...