आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत गोरेगावच्या विहिरीत सापडले दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह; सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये एका विहिरीत दोन मुलींचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिकांना सुरुवातीला आरे कॉलनीतील जंगल सदृश्य परिसरात दोन मुलींच्या चपला आणि शेजारीच दोन मोबाईल सापडले. लोकांनी आसपास शोध घेण्याचा प्रयत्न केला तसेच रहिवासी परिसरातील लोकांचीही चौकशी केली. परंतु, काहीच पत्ता न लागल्याने पोलिसांना फोन करून यासंदर्भातील माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी शोध मोहिम राबवली असता विहिरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह सापडले आहेत. 


सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याचा संशय
या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. पोलिस उपाधीक्षक विनय राठोड यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मंगळवारी रात्री 8:30 पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता. आरे कॉलनीतील एका विहिरीजवळ दोन मुलींच्या चपला आणि दोन मोबाईल दिसून आले. परंतु, आसपास त्यापैकीच कुणीच सापडले नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू केले. यानंतर रात्री उशीरा 12:30 वाजता दोन मुलींचे मृतदेह सापडले. या दोन्ही मुली अल्पवयीन असून आपसात बहिणी होत्या. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करून तूर्तास आत्महत्येची नोंद केली. तरीही यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहे.

 

बातम्या आणखी आहेत...