आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्रदय पिळवटुन टाकणारी घटना; एकाच सरणावर ठेवले दोन मृतदेह, विखरलेले अंत्यसंस्काराचे सामान गोळा करुन चितेला लावली आग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जक्कनपूर- पटना शहरातील जक्कनपूर आणि गुलजारबाग ठाण्यातील बेवारस मृतदेहांचे बांसघाटवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यापद्धतीने या मृतदेहांचे अंत्यसंस्कार झाले ते दृश्य ह्रदय पिळवटून टाकणारे होते. बांसघाटावर चितेच्या अर्धजळीत लाकडांना जमा करुन चिता तयार करण्यात आली. त्यानंतर विखुरलेले सामान गोळा करुन दोन मृतदेहांना एकाच चितेवर ठेवून मुखाग्नी देण्यात आली. पोलिसांनी सांगितल्यानूसार अंत्यसंस्कार करण्यासाठी सरासरी 3 क्विंटल लाकुड आणि अन्य खर्चांसाठी 3 हजार रुपये लागतात. परंतु एका मृतदेहासाठी एक हजार रुपये दिले जातात.

 

> सर्वोच्च न्यायालय 2013- बेवारस मृतदेहांचे व्यवस्थितपणे अंत्यसंस्कार करण्यात यावे.

> गृह मंत्रालय 2016- पोलिस स्टेशनला 50,000 रुपयांचा निधी, पाच हजार रुपये  5000 रु. प्रति बेवारस मृतदेह

 

बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याचे  नियम 

2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विकास चंद्र गुड्डू बाबा यांनी केलेल्या याचिकेनंतर बेवारस मृतदेहांचा सन्मानपुर्वक व्यव्हार करण्याचे आदेश दिले आहे. 2016 रोजी एनसीआरबीनेही बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी काही नियम जाहीर केले होते. परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे.

 

देशातील बेवारस मृतदेहांची संख्या

2014- 35,215 
2015- 34,592 
2016- 43,460

 

> सर्वाधिक मृतदेहांचे प्रमाण धार्मिक ठीकाणांवर 

> गृह मंत्रालयाच्या अहवालानूसार 80 ते 90% मृतदेहांचे अंत्यसंस्कार होत नाही.

बातम्या आणखी आहेत...