Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Dead Body Found in Banana Feald at Yawal, Dahigaon

4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 'त्या' व्यक्तिचा केळी बागेत आढळला मृतदेह, घातपाताचा संशय

प्रतिनिधी | Update - Mar 12, 2019, 05:44 PM IST

सुरेश महाले यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

  • Dead Body Found in Banana Feald at Yawal, Dahigaon

    यावल- दहीगाव येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुरेश विठ्ठल महाले-कोळी (वय-45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. केळीच्या बागेत सुरेश महाले यांचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे.

    सुरेश विठ्ठल महाले हे गेल्या शनिवारपासून दहीगाव येथून बेपत्ता झाले होते. पोलिसांना प्राथमिक माहिती घेऊन कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. मात्र ते मिळून आले नाही तर मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दहिगाव- कोरपावली रस्त्यावर असलेले मनोहर नथु पाटील यांच्या शेत गट क्रमांक 194 मध्ये केळीच्या बागात मध्यवर्ती ठिकाणी मजूर शेतात काम करत असताना त्यांना सुरेश यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत त्यांनी गावात माहिती दिली असता कुटुंबीयांनी व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा केळीच्या बागेत त्यांचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी टाहो फोडला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत तपासाची दिशा ठरणार आहे.

    सुरेश यांना दारूचे व्यसन होते. मात्र त्यांचे कोणाशी वैर नव्हते, अशा नातेवाईकांनी सांग‍ितले: सुरेश यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसात सुभाष विठ्ठल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.

Trending