आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेनच्या टॉयलेटमधून येत होती दुर्गंधी, आतमध्ये होते एक गाठोडे; उघताच सर्वांना बसला शॉक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडीओ डेस्क - रेल्वेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह आढळल्याने उत्तरप्रदेशच्या दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवर गोंधळ माजला होता.  फरक्का एक्सप्रेस मालदा टाउन वरून दिल्लीकडे जात होती. एक्सप्रेसच्या एस 1 कोचमधील शौचालयात मृतदेह आढळून आला होता. एका गाठोड्यात हा मृतदेह बांधण्यात आला होता. मृतदेह सडल्यामुळे त्यातून दुर्गंधी येत होती. माहिती मिळताच जीआरपी जवानांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. मृतकाची ओळख पटली नाही. 


दुर्गंधी येण्याबाबत केली होती तक्रार. 

> मालदा टाउन ते दिल्लीकडे जाणाऱ्या फरक्का एक्सप्रेसच्या एस 1 स्लीपर कोच शौचालयातून दुर्गंध येत असून त्यात मृतदेह असल्याची रेल्वे कंट्रोलद्वारे जीआरपीला सुचना मिळाली होती. रेल्वे दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवर पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या जीआरपी जवानांनी मृतदेह ताब्यात घेतला. गाठोडे उघडल्यानंतर त्यात डेड बॉडी असल्याचे लक्षात आले. डेड बॉडी 2-3 दिवसांपूर्वीची असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या जीआरपी या प्रकरणाची तपासणी करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...