Home | National | Uttar Pradesh | Dead Body Found in Telangana Express in Lalitpur Station

मध्यरात्री ट्रेनमध्ये AC बोगीच्या छतातून रक्ताचे थेंब पडताना बघून पॅसेंजर्सचा आरडाओरडा, ट्रेन थांबताच समोर आले भयावह सत्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 10:00 AM IST

नवी दिल्लीहून हैदराबाद येथे जाणा-या तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री खळबळ उडाली.

 • Dead Body Found in Telangana Express in Lalitpur Station


  ललितपुर (यूपी): नवी दिल्लीहून हैदराबाद येथे जाणा-या तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री खळबळ उडाली. या ट्रेनच्या दोन AC बोगीच्या मध्यभागी असलेल्या कपलिंग बफरच्या वर पोत्यात एक मृतदेह आढळून आला. पॅसेंजर्सनी दिलेल्या माहितीनंतर ट्रेन ललितपूर स्टेशनवर थांबवण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस अधिकारी संजय सिंह यांनी जेव्हा पोत्यातील मृतदेह बघितला तेव्हा सगळ्यांचेच होश उडाले. पोत्यात रक्ताने माखलेला एका तरुणाचा मृतदेह होता. त्याचा चेहरा अतिशय विद्रूप झाला होता. मृतदेहाच्या हातावर 786 आणि मोहम्मद सरताज नाव गोंदलेले होते. या युवकाची निर्घृण हत्या करुन मृतदेह ट्रेनमध्ये ठेवण्यात आला होता.

  - मिळालेल्या माहितीनुसार, 12724 तेलंगाणा एक्स्प्रेस सोमवारी रात्री 12 वाजून 13 मिनिटांनी झांशी स्टेशनहून भोपाळसाठी रवाना झाली होती. या ट्रेनच्या एसी कोच बी 4मध्ये तेलंगाणासाठी पत्नीसोबत प्रवास करणारे फरीदाबादचे धर्मवीर यांनी कोचमध्ये हजर सीटीई एमएच खान यांच्याकडे बॅग चोरी गेल्याची तक्रार नोंदवली होती.

  - पॅसेंजरने सीटीईला सांगितले की, झांशीच्या आधीर करारी स्टेशनजवळ काही गुंडांनी त्यांच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आणि मुलांची कपड्यांची बॅग चोरी केली. त्यांचा पाठलाग केला असता, चोरांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पॅसेंजरच्या तक्रारीनंतर सीटीई ट्रेनमध्ये पहा-यावर असलेल्या जीआरपी स्टाफ चोरांच्या शोधावर निघाले.
  - याचदरम्यान एसी कोच बी4 आणि बी3 ला जोडणा-या कपलिंग बफरवर पॅसेंजर धर्मवीर यांना रक्ताचे थेंब पडताना दिसले. त्यांनी तत्काळ याची सूचना सीटीई आणि जीआरपी यांना दिली.

  ललितपूर स्टेशनवर थांबवण्यात आली ट्रेन
  - रक्ताचे थेंब बघून सीटीईने कंट्रोल रूमला याची सूचना दिली, त्यानंतर ललितपुर स्टेशनवर रात्री एक वाजून 35 मिनिटांना ट्रेन थांबवण्यात आली.
  - प्लॅटफॉर्मवर उपस्थित जीआरपी कर्मचा-यांना कोचच्या मध्ये कपलिंग बफरच्या वर एका पांढ-या रंगाच्या पोत्यात तरुणाचा मृतदेह आढळला.
  - ललितपूर जीआरपी संजय सिंह यांनी सांगितल्यानुसार, सीटीआईने माहितीच्या आधारावर तक्रार दाखल केली आहे. तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. स्टेशनवर तासभर ट्रेन थांबवण्यात आली होती.

Trending