आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीतून नाणी गोळा करताना मुलांना सापडली लोखंडी पेटी, कुलूप तोडताच पळत सुटले; सर्वत्र खळबळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानच्या बेणेश्वर धामजवळ एका पुलावर सोमवारी दुपारी लहान-लहान मुले नदी उड्या मारून नाणी शोधत होते. बेणेश्वर धामला येणारे भाविक श्रद्धेने येथील नदीत नाणी फेकत असतात. परंतु, नाणी शोधणाऱ्या या मुलांना अचानक नदीत एक लोखंडी पेटी दिसून आली. आपल्या हाती खजिना लागला की काय हे समजून त्यांनी वेळीच ती पेटी बाहेर काढली. पेटीला लॉक होते. त्यांनी उत्सुकतेने लगेच ते कुलूप तोडले. आत खजिना नाही तर एका युवकाचा मृतदेह होता. त्याच्या गळ्यावर हल्ल्याच्या खुणा होत्या. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला आहे.


पेटीत मृतदेहासोबत भांडेही होते...
नदीत सापडलेल्या पेटीत फक्त मृतदेहच नाही तर थाळी, चमचा, लोटा, ग्लास आणि इतर भांडी सुद्धा सापडल्या आहेत. मृतदेहासोबत कुणी भांडी का ठेवली असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. बहुतांश धातूच्या भांड्यांवर नावे कोरलेली असतात. त्यावरून मृतदेहाची ओळख पटेल अशी शक्यता पोलिसांना वाटत होती. परंतु, त्यावर कुठल्याही प्रकारची नावे नाहीत. यानंतर पोलिसांनी गावकऱ्यांना पुलावर बोलावून तो मृतदेह दाखवला. परंतु, कुणालाही त्याचे नाव किंवा ओळख सांगता आली नाही. या परिसरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. त्यामुळे, कुणी बाहेरून आलेल्या व्यक्तीने हत्या करून मृतदेह नदीत फेकला आणि पसार झाला अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, पोलिसांनी जवळपासच्या परिसरातील सर्वच पोलिस स्टेशन्सला यासंदर्भातील माहिती पाठवली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...