Home | Maharashtra | Vidarva | Akola | Dead body of daughter and mother found, father still missing

पुरात वाहून गेलेल्या माय-लेकाचे मृतदेह सापडले; वडील अद्यापही बेपत्ता

प्रतिनिधी | Update - Aug 24, 2018, 01:11 PM IST

सेल्फी काढण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तीन जण पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्देवी घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होत

  • Dead body of daughter and mother found, father still missing

    संग्रामपूर- सेल्फी काढण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तीन जण पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्देवी घटना २२ ऑगस्ट रोजी घडली होती. त्यापैकी आज, २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मातेचा मृतदेह पहुरपुर्णाजवळ तर संध्याकाळी सात वाजता मुलाचा मृतदेह मानेगाव शिवारात सापडला आहे. तर या घटनेतील वडील अद्यापही बेपत्ता आहेत. वडिलांच्या शोधार्थ उद्या, २४ ऑगस्ट रोजी पुन्हा रेस्क्यू टीमच्या वतीने शोध मोहीम राबवण्यात येणार आहे.


    अकोला जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथील मूळ रहिवासी असलेले राजेश गुलाबराव चव्हाण हे जळगाव जामोद येथील बुलडाणा अर्बनमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होते. घर बांधल्यामुळे त्यांचे वास्तव्य जळगाव जामोदमध्येच होते. दरम्यान, २२ आॅगस्ट रोजी ते व त्यांचे कुटुंब कवठा बहादूर येथून शेगावमार्गे परत येत होते. खिरोडा पुलावर येताच त्यांचा १३ वर्षीय मुलगा श्रावण हा सेल्फी काढत होता. यातच तोल गेल्यामुळे तो पूर्णा नदीच्या पुरात पडला. त्याला वाचवण्यासाठी आई सरिता चव्हाण, वय ३९ वर्षे या सुद्धा नदी पात्रात पडल्या. माय लेकांना वाचवण्यासाठी वडील राजेश चव्हाण यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तिघेही वाहून गेले. दरम्यान, आज सकाळी सात वाजेपासून रेस्क्यू पथकाचे अभिजीत आसोडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध मोहिमेला सुरुवात केली.


    जवळपास ३५ ते ४० किलोमीटर परिसर पिंजून काढला असता सकाळी दहा वाजता आई सरिता चव्हाण यांचा मृतदेह पहुरपुर्णाजवळ तर संध्याकाळी सात वाजता मुलगा श्रावण याचा मृतदेह मानेगाव शिवारात सापडला आहे. तर वडील राजेश चव्हाण हे अद्यापही बेपत्ता आहेत. शेगाव ग्रामीण, संग्रामपूर, जळगाव जामोद व नांदुरा येथील पोलिस व महसूल कर्मचारी ही शोध मोहीम राबवत आहेत. दरम्यान, आज संध्याकाळी अंधार पडल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.

Trending