Home | National | Other State | Dead body of Girl found one day before her marriage near Kanpur in Bithoor

घरात सुरू होती लग्नाची तयारी, तेवढ्यात आलेल्या एका बातमीने घरावर पसरले दुःखाचे सावट; रस्त्याच्याकडेला मिळाला होणाऱ्या नवरीचा मृतदेह

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 06:05 PM IST

18 एप्रिल रोजी होणार होते लग्न, एक दिवस अगोदर केली मुलीची क्रुर हत्या

 • Dead body of Girl found one day before her marriage near Kanpur in Bithoor


  कानपूर - येथे लग्नाच्या एकदिवस अगोदर नवरीची क्रुरपणे हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुलीची ओळख पटू नये यासाठी मारेकऱ्यांनी दगडाने तिचा चेहरा ठेचण्याचा प्रयत्न केला. बुधवारी सकाळी नारामाऊ येथील सामसुम रस्त्याच्या कडेला युवतीचा मृतदेह मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला आहे.


  कुटुंबीय म्हणाले - रात्रीपर्यंत घरीच होती मुलगी

  - अन्नपूर्णा (20 वर्ष) असे मयत युवतीचे नाव आहे. 18 एप्रिल रोजी अन्नपूर्णेचा विवाह होणार होता. घरातील सर्व लोक लग्नाच्या तयारीत मग्न होते. तेवढ्यात आलेल्या एका बातमीमुळे कुटुंबीय शोकात बुडाले. नारामाऊ गावातील ग्रामस्थ राकेश गौतम यांना सर्वप्रथम मृतदेहाची माहिती मिळाली. तर अन्नपूर्णाच्या आजोबांचे म्हणणे आहे की, आमचे गावात कोणाशीही वैर नव्हते. आमच्या मुलीला कोणी आणि का मारले याबाबत कोणतीही माहिती नाही. गेल्या रात्री ती घरातच होती. पण तेथे कशी पोहोचली याबाबत कोणतीही कल्पना नाही.

  पोलिसांना व्यक्त केला खूनाचा संशय

  - सीओ कल्याणपूर अजय कुमारच्या मते, नारामाऊ गावापासून 600 मीटर अंतरावरील एक कच्च्या रस्त्यावर एक युवतीचा मृतदेह मिळाला. मृतदेहाकडे पाहून तिचा चेहरा आणि डोक्या प्रहार करून हत्या करण्यात आल्याचे समजते. युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. लवकरच या घटनेचा खुलासा करण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Trending