आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंडेश्वर धबधब्यात बुडून ठाण्यातील 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, मनाई असतानाही मित्रांसोबत उतरला होता पाण्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथील बदलापूरजवळ असलेल्या कोंडेश्वर धबधब्याच्या पाण्यात बुडून एका तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, या तरुणाचे नाव रोशन मोरे (24) असून तो मूळचा ठाणे येथील रहिवासी होता. आपल्या मित्रांसोबत तो कोंडेश्वर धबधब्याजवळ फिरण्यासाठी आला होता. मनाई असतानाही तो या धबधब्याच्या कुंडात पोहण्यासाठी उतरला. यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. 


पोलिसांनी कोंडेश्वर धरणाच्या कुंडातून गुरुवारी सकाळी रोशनचा मृतदेह बाहेर काढला. तसेच यासंदर्भात त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, दरवर्षी पावसाळ्यात या धबधब्याच्या कुंडामध्ये पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना घडतात. त्यामुळे, प्रशासनाने नेहमीप्रमाणेच यावर्षी सुद्धा या कुंडात पर्यटकांना पोहण्यास सक्त मनाई केली होती. तरीही पर्यटकांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही. असाच मोह ठाण्यातील रोशन मोरेच्या जीवावर बेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...