Home | National | Other State | Dead body of worker hang in air even after his death

भिंतीजवळ उभा होता युवक, लोकांना वाटले की काहीतरी काम करतोय; पण जवळून पाहिल्यानंतर लोकांना फुटला घाम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 10:49 AM IST

हवेत लटकत होता युवक, भिंत आणि छतामध्ये फसली होती मान

  • खरगोन : येथील पंचशील कॉलनीमध्ये एका घराचे काम करत असताना एक कामगाराचा मृत्यू झाला. मजूर अरबाज आलम खुर्चीवर उभा राहून भिंत बांधत होता. भिंत बांधत असताना अचानक त्याच्यावर घराचे छत कोसळले. या दुर्घटनेत भिंत आणि छप्परमध्ये मजूराची मान अडकली आणि त्याचा मृत्यू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे जवळपास अर्धा तास मजुराचा मृतदेह हवेतच लटकत होता. या घटनेमध्ये तेथील काम करणारे इतर मजूरही जखमी झाले आहे.

    घटनेची होत आहे तपासणी, निष्काळजीपणा आढळल्यास होणार गुन्हा दाखल
    घटनेची माहिती मिळताच कोतवाल टी.आय. संजय हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंत्राटदार आणि घरमालकाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. निष्काळजीपणा केल्याचे चौकशीत आढळते तर गुन्हा दाखल होऊ शकतो. याशिवाय मुलांकडून काम करून घेत असल्याप्रकरणी श्रम विभागाकडून देखील कारवाई होऊ शकते.

Trending