आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीरामपूर- मागील काही दिवसांत जिल्ह्यात बिबटे मृतावस्थेत आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. पारनेर, राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यात अनेक बिबटे अनैसर्गिक कारणांनी मरण पावले. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगावजवळील कान्हेगाव येथील शेतकरी बाबासाहेब विठ्ठल खरात यांच्या उसाच्या शेतात (गट क्रमांक ४६) मंगळवारी बिबट्या मृतावस्थेत आढळला.
सकाळी बाबासाहेब खरात शेतात गेले असता त्यांना उसाच्या सरीच्या बांधावर बिबट्याचा मृतदेह दिसला. बिबट्याचा मेल्याची बातमी पसरल्यामुळे गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. खरात यांनी वनपाल दशरथ झिंजुर्डे व सुरसे यांच्याशी संपर्क साधून बिबट्याच्या मृत्यूची माहिती दिली. ते तातडीने कान्हेगावला आले. मृत बिबट्या एक ते दीड वर्षाचा मादी जातीचा असून या घटनेचा पंचनामा करणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
प्रवरा नदी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर अाहे. बिबट्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याने हल्ले करत फडशा पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. बिबट्याची काही पिल्ले नागरिकांनी पाहिली आहेत. मागील काही दिवसांत वाहनाची धडक बसून बिबटे ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
कान्हेगाव येथील शेतकरी बाबासाहेब विठ्ठल खरात यांच्या शेतात मृतावस्थेत आढळलेला बिबट्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.