आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 वर्षांच्या आलिया भट्‌टने केले डेडलिफ्ट, व्हायरल झाला जिममध्ये 70KG वजन उचलण्याचा व्हिडीओ 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आलिया भट्टचा एक वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती डेडलिफ्टिंग करताना दिसत आहे. विशेष गोष्ट ही आहे की, व्हिडिओमध्ये आलियाने 70 किलोचे वजन उचलले आहे जे तिच्या वजनापेक्षा जास्त आहे.  

जिमने शेअर केला व्हिडीओ... 
आलियाच्या या विशेष वर्कआउटचा व्हिडीओ तिची जिम सोहफिटच्या सोहराब खुश्रुशाहीने जिमच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "आलिया कौतुकास पात्र आहे. जेव्हा तिने वर्षाच्या सुरुवातीला वर्कआउट करायला सुरुवात केली आहे, तेव्हा तिला वजन उचलता येत नव्हते. स्ट्रॉन्ग बनण्यासाठी आणि हे एन्जॉय करण्यासाठी तिला थोडा वेळ लागला. तिने पहिल्यांदा डेडलिफ्ट ट्राय केले होते. तेव्हा आम्ही 20 LB डम्बलचा वापर केला होता. ही गोष्ट 9 महिने जुनी आहे. काही आठवड्यांपूवी तिने 50 किलोचे वजन उचलले आणि 5 रॅप्स पूर्ण केले. आजदेखील लिफ्टिंड डे होता. काही वॉर्मअप सेट्सनंतर तिने 60 किलोचे 3 रॅप्स पूर्ण केले. वैयक्तिकरित्या हा तिचा सर्वात उत्तम प्रयत्न होता आणि तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने एकदाच 70 किलो वजन उचलले. आलिया भट्टसमोर कोणतेही आव्हान ठेवा, ती कधीही मागे हातात नाही. आम्हाला हे आवडते आम्ही नव्या लेव्हल सेट करू." 

'सडक-2' शूटिंग करत आहे आलिया... 
आलिया भट्‌ट सध्या आपले वडील महेश भट्‌ट यांचा कमबॅक चित्रपट 'सडक-2' चे शूटिंग करत आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, पूजा भट्‌टदेखील असतील. याव्यतिरिक्त ती 'ब्रह्मास्त्र', 'इंशाल्लाह' सारख्या चित्रपट दिसणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...