आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहावी व बारावी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ, विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून विहित मुदतीत वाढ देण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांना आता नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल तर बारावीच्या विद्यार्थ्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करण्यास अंतिम मुदत असणार आहे.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या नियमित, पुर्नपरीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन पद्धतीने आवेदनपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीसाठी नियमित शुल्कासह 15 आॅक्टोबर ते 20नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करण्यासाठी विहित मुदत देण्यात आली होती. तर विलंब शुल्कासह 21 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करण्याची मुदत होती. यात वाढ करण्यात आली असून आता नियमित शुल्कासह 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा लागेल. तर विलंब शुल्कासह 10 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. बारावीसाठी नियमित शुल्कासह 3 आॅक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करण्यासाठी विहित मुदत देण्यात आली होती. तर विलंब शुल्कासह 16 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करण्याची मुदत होती. यात वाढ करण्यात आली असून आता नियमित शुल्कासह 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करावा लागेल. तर विलंब शुल्कासह 5 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जाची सुविधा उपलब्ध आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी पुर्नपरीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणार्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे आॅनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांनी चलन डाउनलोड करून बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखाही जाहीर झाल्या असून दहावीसाठी 11 डिसेंबरपर्यंत तर बारावीसाठी 6 डिसेंबरपर्यंत चलन भरावे लागेल.खासगीरित्या प्रविष्ट हाेणाऱ्या (17 नंबर अर्ज) विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीसाठी नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी 29 जुलै ते 30सप्टेंबर मुदत देण्यात आली होती. मात्र या विद्यार्थ्यांनाही अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली असुन विलंब शुल्कासह दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 29 नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येईल. तर अतिविलंब शुल्कासह 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरदरम्यान अर्ज करता येईल.

बातम्या आणखी आहेत...