आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deadpool Fame Actor Ryan Reynolds Wants To Come To India, Saying 'I Love Bollywood Movies'

भारतात येऊ इच्छितो 'डेडपूल' फेम अभिनेता रेयान रेनॉल्ड्स, म्हणाला - 'मला बॉलिवूडचे चित्रपट खूप आवडतात' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'डेडपूल' फेम हॉलिवूड अभिनेता रेयान रेनॉल्ड्स बॉलिवूड सिनेमाचा मोठा चाहता आहे. नुकतेच त्याने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला बॉलिवूड चित्रपट खूप आवडतात आणि आपल्या चाहत्यांना भेटायला तो लवकरच भारतात येणार आहे. एवढेच नव्हे तर त्याने बॉलिवूडचे खूप कौतुक केले आणि त्यांचा मोठा हातभार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे 'डेडपूल' खूप पसंती मिळाली होती. मुलाखतीत रेयान म्हणाला, मला भारतीय संस्कृती आणि सिनेमा खूप आवडतो. मी लहान असताना भारतातल्या काही गोष्टी पाहिल्या आहेत. तो म्हणाला, मला भारतात येऊन माझ्या चाहत्यांना भेटायचे आहे. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार वर्षानुवर्षे चित्रपटसृष्टीत होणारे बदल बरेच चांगले झाले आहेत.