आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Death Anniversary: Anupam Kher Remembered Late Reema Lagoo, Wrote On Twitter 'You Miss A Lot'

डेथ अॅनिवर्सरी : रीमा लागू यांची आठवण आली आणि अनुपम खेर यांनी ट्विटरवर लिहिले - 'तुमची खूप आठवण येते'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अनुपम खेर यांनी ट्विटरवर अभिनेत्री रीमा लागू यांच्या दुसऱ्या डेथ अॅनिवर्सरीवर त्यांची आठवण काढली. अनुपम यांनी ट्विटरवर लिहिले, 'मी रीमा लागू यांना खूप मिस करतो आहे. अनुपमने रीमा यांचा पहिला मराठी फिल्म सिंहासनचा एक फोटोदेखील शेयर केला आहे. अनुपम आणि रीमा यांनी 'मैंने प्यार किया', 'हम आपके हैं कौन', 'कुछ कुछ होता है' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.   

 

 

कार्डियक अरेस्टने झाले होते त्यांचे निधन... 
59 वर्षांच्या रीमा यांचे निधन कार्डियक अरेस्टमुळे झाले. 17 मे 2017 च्या रात्री 1 वाजता त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले गेले होते. सुरुवातीच्या उपचारादरम्यान त्या झोपल्या होत्या. मात्र झोपेतच त्यांना अटॅक आला. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अखेरच्या त्या सीरियल 'नामकरण' मध्ये दमयंती मेहताचा रोल करत होत्या. रीमा लागू बॉलिवूडच्या सर्वात जास्त प्रसिद्ध आईंपैकी एक समजल्या जातात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सलमान खानच्या आईची भूमिका साकारली आहे. 

 

रीमा यांचा जन्म 1958 ला पुण्यामध्ये झाला होता. येथीलच हुजुरपागा शाळेत आपले शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्यांनी मराठी नाटकांमध्येही काम करायला सुरुवात केली होती. रीमा यांचे लग्न फेमस अभिनेता विवेक लागूसोबत झाले होते, पण नंतर ते वेगवेगळे राहायला लागले होते. त्यांची मुलगी मृण्मयी मराठीव्यतिरिक्त हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...