अमेरिकेत टेक्सास शहरात / अमेरिकेत टेक्सास शहरात लग्नानंतर दोन तासांतच नवदांपत्याचा मृत्यू

वृत्तसंस्था

Nov 10,2018 10:36:00 AM IST

टेक्सास - अमेरिकेतील टेक्सास शहरात लग्नानंतर अवघ्या २ तासांतच हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्याने नवविवाहित दांपत्याचा अपघाती मृत्यू झाला. लग्नानंतर ते दोघे स्वागत समारंभासाठी उवाल्डे येथे जात होते. वाटेतच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. अपघातात पायलटही दगावला आहे. माहितीनुसार, विल्यम बायलर (२३) व त्यांची पत्नी बेली (२३) बायलर टेक्सासच्या विद्यापीठात कार्यरत होते.

२०६ बी हेलिकॉप्टरने स्वागत समारंभास जात असताना कार्यक्रमस्थळापासून काही मैल अंतरावरच त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. टेक्सासच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सुरक्षा बोर्डाच्या मते अपघाताचे कारण समजले नाही.

X
COMMENT