आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलगावच्या साखर कारखान्यात ट्रॅक्टरच्या धडकेने मजुराचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गव्हाणीवर साफसफाईचे काम करणाऱ्या मजुराला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. सखाराम रावण मोरे (६०, रा . कारी )असे मृताचे नाव आहे. कारी येथील सखाराम मोरे हे गावातीलच ठेकेदार व्यंकटराव मोरेंमार्फत कारखान्यात साफसफाईचे काम करत होते.

 

गव्हाण असणाऱ्या ठिकाणी विविध वाहनांमार्फत आणलेला ऊस या ठिकाणी टाकण्यात येतो. गुरुवारी सखाराम मोरे हे येथे गव्हाणीच्या कामावर साफसफाईचे काम करत होते. या वेळी नेहमी प्रमाणे मोहखेड येथील ट्रॅक्टर (एम. एच . ४२ बी. २६५४) ने भरून आणलेला ऊस गव्हाणीमध्ये टाकल्यानंतर परतू लागले. या वेळी चालक तानाजी सोळंकेंना साफसफाई करणारे मजूर मोरे न दिसल्याने त्यांना ट्रॅक्टरच्या समोरील भागाच्या चाकाची धडक लागली. यामध्ये मोरे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना बीडला हलवले होते. परंतु, उपचारादरम्यान मोरेंचा दुपारी मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मोरेंवर कारी येथे अंत्यसंस्कार केले.

बातम्या आणखी आहेत...