आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकीच्या दहशतीत हृदयविकाराने मृत्यू; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - जमीन गहाण ठेवून व्याजाने घेतलेल्या रकमेची परतफेड केल्यानंतरही पैशासाठी वारंवार धमक्या देण्यात येत असल्याने सुरेश शंकरराव गिरडे (४५) यांचा तणावात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री सिडकोत घडली. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर शुक्रवारी नांदेड ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.   


सिडको येथील ऑटोचालक सुरेश  गिरडे  यांनी  माधवराव कागणे व संजय नागरगोजे यांच्याकडून एक एकर शेती गहाण ठेवून १ लाख ५० हजार रुपये घेतले होते. ही रक्कम १५ ऑक्टोबर २०१६ रोजी संबंधितांना परत करण्यात आली. परंतु कागणे व नागरगोजे यांनी सुरेश गिरडे यांच्या नावे असलेली एक एकर जमीन वारंवार विनंती करूनही परत करण्यास चालढकल केली.

 

त्यानंतर दोघेजण वारंवार पैशाची मागणी करत असत. बायपास झाल्यामुळे व हृदयविकाराचा आजार असल्याने संबंधितांकडून वारंवार येत असलेल्या धमकीने गिरडे यांनी धास्ती घेतली होती. त्या धास्तीनेच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...