आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लखनऊ/हरिद्वार(उत्तर प्रदेश)- उत्तराखंडमध्ये विषारी दारू पिल्याने जीव जाणाऱ्यांची संख्या 75 वर गेली आहे. यूपीच्या सहारनपूरमध्ये 46, कुशीनगरमध्ये 11 आणि बरेलीमध्ये 1 चा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये 17 जण मृत्यूमुखी पडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तराखंडमध्ये एका गावात तेराव्याच्या जेवणानंतर मृत्यूचे तांडव सुरू झाले होते. जाणून घ्या काय आहे प्रकरण.
तेराव्यात दिली गेली कच्ची दारू
- उत्तराखंडचे अतिरिक्त पोलिस महानिदेशक अशोक कुमार यांनी सांगितले की, गुरूवारी संध्याकाळी हरिद्वारच्या झबरेडा क्षेत्रातील बालूपूर गावात एता मृत व्यक्तीच्या तेराव्यात कच्ची दारू दिली गेली, त्यानंतर लोकांची तब्येत खराब होणे सुरू झाले.
- बालूपूर, बिंदूखडक, जहाजगढ, भलस्वागाजमध्ये तेराव्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच लोकांची तब्येत खराब होणे सुरू झाले. सुरूवातीला लोकांना वाटले की, दारू पिल्याने तब्येत खराब झाली असावी.
- लोकांना पोट दुखी, उल्टी आणि अस्वस्थपण जाणवू लागला. जे लोक घरी जाऊन झोपले, ते उठलेच नाही, तर काहिंना रूग्णालयात भर्ती करावे लागले. गावात अनेक ठिकाणी पॉलीथीनचे पाउच पसरलेले अढळले, ज्यातून दारू सप्लाय केली गेली होती.
यूपीत मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख भरपाई
- सहरानपूरचे डीएम आलोक पांडेय यांनी सांगितले की, आतापर्यंत जिल्ह्यात 46 लोकांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहेत, त्यापैकी 36 लोकांचा मृत्यू विषारी दारू पिल्याने झाल्याचे समोर आले आहे.
- CM योगी आदित्यनाथ यांच्या आदेशावर शुक्रवारी सहारनपूर आणि कुशीनगरमध्ये पोलिस आणि आबकारी विभागातील 9 कर्मचाऱ्यांना निलंबीत केले गेले.
- लोकांनी आरोप लावला की, या दोन्ही विभागाच्या संगनमताने राज्यात बेकायदेशीर दारूची विक्री वाढली आहे, आणि याला नेत्यांचेही समर्थन आहे.
- यूपीच्या यात जिल्ह्यात 70 पेक्षा जास्त लोक आजारी असल्याचे समोर आले आहेत, तर उत्तराखंडमध्ये 40 लोक गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
- यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांनी प्रकरणाचा तपास लावण्यासोबतच मृतांच्या कुटुंबीयांना 2-2 दोन लाख भरपाई देण्याचे सांगितले आहे, तर आजारी लोकांना प्रत्येकी 50 हजार देण्याची घोषणा केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.