आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजी आणि आजारी वडिलांसोबत राहत होती 8 वर्षांची मुलगी, अत्‍यंत आनंदी दिसायचे कुटुंब; अचानक घरात आढळला मुलीचा मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्‍टीन - अमेरिकेत 8 वर्षीय चिमुरडीची तिच्‍या कुटुंबियांनीच छळ करून हत्‍या केल्‍याची घटना घडली. मुलगी आजी आणि आपल्‍या आजारी वडिलांसोबत राहत होती. तिचा मृत्‍यू होईपर्यंत शेजारच्‍यांनाही हे एक सुखी कुटुंब असल्‍याचे वाटत होते. मात्र पोलिसांना चिमुरडीचा मृतदेह पाहून शंका आली व त्‍यांनी तपास सुरू केला असता तिच्‍या मृत्‍यूचे खरे कारण सर्वांसमोर आले. यामुळे शेजारच्‍यांनाही धक्‍का बसला. मुलगी घरात नेहमी एका जर्नलमध्‍ये लिहित असे. त्‍यामध्‍ये तिने आजीच्‍या टॉर्चरबद्दल लिहिले आहे.

 

व्हिडिओ आणि जर्नलमध्‍ये टॉर्चरचा खुलासा
- ही घटना 5 वर्षांपूर्वींची असून टेक्‍सास स्‍टेटमधील ऑस्टिन शहरात ही घडली आहे. 8 वर्षांची गिजेल आपली आजी हेलन फोर्ड आणि अंथरूणाला खिळलेले आजारी वडिल अँड्रे फोर्डसोबत राहत होती.
- हेलनच संपुर्ण घराची देखभाल करत असे. त्‍यांच्‍या शेजारच्‍यांना हे एक सुखी कुटुंब असल्‍याचे वाटत होते. मात्र गिजेलच्‍या मृत्‍यूनंतर या कुटुंबाचे सत्‍य सर्वांसमोर आले.
- 12 जुलै 2013मध्‍ये घरात अचानक गिजेलचा मृतदेह मिळाला. तिच्‍या शरीरावर अनेक जखमा होत्‍या. तिच्‍या गुडघे आणि पायांवर तिला बांधले असल्‍याचे निशाण मिळाले.
- गिजेलच्‍या डोक्‍यावरही जखमांच्‍या अनेक खुणा होत्‍या. यामुळे पोलिसांना शंका आली व त्‍यांनी तपास सुरू केला. पोलिसांना घरात काही जर्नल आणि व्हिडिओज मिळाले.
- गिजेलने आपल्‍या वडिलांच्‍या मोबाईलवर घरात स्‍वत:वर होणा-या अत्‍याचाराची दृश्‍य कशीबशी कैद केली होती. तर जर्नलमध्ये तिने स्‍वत:वर केल्‍या जाणा-या टॉर्चरबद्दल लिहिले होते. गिजेलची आजी तिला रोज मारहाण करायची व तासतास उभी ठेवायची.
- पोलिसांनी हस्‍तगत केलेल्‍या व्हिडिओ आणि जर्नलमधून खुलासा झाला आहे की, गिजेलला कित्‍येक‍ दिवस जेवण आणि पाणीही दिले जायचे नाही. यावरून गिजेल ओरडायला लागली की, तिच्‍या तोंडात सॉक्‍स कोंबले जायचे.


जर्नलमध्‍ये लिहिली आपली स्‍वपनं
- मात्र रोज ऐवढे टॉर्चर होऊनही गिझेल आशावादी असल्‍याचे समोर आले आहे. तिने जर्नलमध्‍ये आपल्‍या स्‍वप्‍नांविषयी आणि भविष्‍यातील योजनांविषयी लिहिले आहे. सोबत शाळा आणि जम्‍प रोप आपल्‍याला फार आवडत असल्‍याचे गिजेलने लिहिले आहे.


कोर्टाने सुनावली शिक्षा
- जेव्‍हा कोर्टात हे प्रकरण सुनावणीसाठी आले तोपर्यंत गिजेलच्‍या आजारी वडिलांचे निधन झाले होते. मात्र आजी हेलनला गिजेलच्‍या मृत्‍यूप्रकरणी दोषी ठरविण्‍यात आले. तिला जन्‍मठेपेची शिक्षा सुनावण्‍यात आली.
- कोर्टाने मान्‍य केले की, देशात लिगल सिस्‍टीम असतानाही गिजला हे सर्व सहन करावे लागले. फॅमिली सर्व्हिस इन्‍व्‍हेस्टिगेटरला मुलीच्‍या स्थितीबाबत माहिती असूनही त्यांनी काहीच पावले उचलली नाहीत. तर तिच्‍यावर उपचार करणा-या डॉक्‍टरनेही याबाबत पोलिसांकडे माहिती दिली नाही.    

 

बातम्या आणखी आहेत...