Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Death of a devotee of Jalgaon drowning in Chandrabhaga River

चंद्रभागेच्या पात्रात बुडून जळगावच्या भाविकाचा मृत्यू

प्रतिनिधी | Update - Aug 30, 2018, 06:43 AM IST

पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले जळगावातील चार भाविक बुधवारी सकाळी चंद्रभागा नदीच्या पात्रात वाहून गेले होते. वाहू

  • Death of a devotee of Jalgaon drowning in Chandrabhaga River

    पंढरपूर/जळगाव- पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले जळगावातील चार भाविक बुधवारी सकाळी चंद्रभागा नदीच्या पात्रात वाहून गेले होते. वाहून गेलेल्यांपैकी तीन भाविकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, राहुल रवींद्र काथार (वय २५, रा. जळगाव) याचा बुडून मृत्यू झाला.


    जळगाव येथील नितीन दत्तू कुवर (२२), राजेंद्र अशोक सोनार (२२), भरत रवींद्र काथार (२२) आणि त्याचा मोठा भाऊ राहुल रवींद्र काथार हे चौघे जण पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी ते सर्व चंद्रभागेत स्नानासाठी गेले होते. सध्या उजनी धरण शंभर टक्के भरल्यामुळे धरणातून चंद्रभागेत पाणी सोडले जात आहे. चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे स्नानासाठी गेलेल्या चार तरुण भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. कोळी बांधवांनी तीन भाविकांना वाचवले, तर राहुल याचा मृतदेह पात्रात सापडला. काही दिवसांपूर्वी लखन टोपे, तर मंगळवारी मंगळवेढ्याचे सचिन बिराजदार यांचा मृत्यू झाला आहे.

Trending