आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या धक्क्याने अजनुज येथील ग्रा.पं.सदस्याचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- भीमा नदीकाठी असलेल्या अजनुज (पवारवाडी) येथील रहिवासी व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब दत्तात्रय नांदगुडे (वय २४) हे आपल्या घराशेजारच्या विहिरीवरील विद्युतपंप चालू करायला गेले असताना विजेचा जोराचा झटका बसून मरण पावले. ही घटना सोमवारी घडली. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी व दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. 


समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पाण्यावाचून पिके जळून चालली आहेत. विहिरीत जे पाणी शिल्लक आहे, ते देण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजता वीज आल्यानंतर विहिरीवरील मोटार चालू करायला नांदगुडे गेले. रात्री उंदरांनी वायर कुरतडल्याने वीजप्रवाह मोटारीत उतरला होता. नांदगुडे यांनी मोटारीच्या खोक्याला हात लावताच त्यांना विजेचा जोराचा झटका बसला. ते खाली पडलेले पाहून आईने आरडाओरडा केला. शेजारी राहणाऱ्या लोकांनी विहिरीकडे धाव घेऊन विद्युतप्रवाह बंद करून सदस्य नांदगुडे यांना दौंड येथील रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीला माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, जिल्हा परिषद सदस्य रमेश गिरमकर यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

बातम्या आणखी आहेत...