Home | National | Other State | death of a mother with 3 children from falling into the well

चिमुरड्याचीही केली नाही कीव, दोन मुले एका मुलीली विहिरीत फेकून आईनेही उडी घेत केली आत्महत्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 01:25 PM IST

बुधवारी एकाच सरणावर आईसह तीन मुलांवरही अंत्यसंस्कार करण्यात आला.

 • death of a mother with 3 children from falling into the well
  अलवर - येथे मंगळवारी एका 26 वर्षीय विवाहितेने तीन मुलांना विहिरीत फेकत स्वतःदेखिल उडी घेऊन आत्महत्या केली. या विवाहितेने एकानंतर एक मुलांना विहिरीत फेकले आणि शेवटी स्वतः उडी घेतली. त्यात चौघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. नातेवाईकांनी पतीकडून पत्नी आणि मुलांना वारंवार होणारी मारहाण हे कारण असल्याचे म्हटले आहे. बुधवारी एकाच सरणावर आईसह तीन मुलांवरही अंत्यसंस्कार करण्यात आला. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
  दुपारी तीन मुलांना घेऊन घरबाहेर पडली होती महिला
  हाती आलेल्या माहितीनुसार अलवर जिल्ह्यातील खौकर परिसरात राहणाऱ्या सरौज बैरवा (26) या मंगळवारी सायंकाळी तीन मुलांसह घराबाहेर पडल्या होत्या. सुमारे 6 वाजेपर्यंतही घरी परतल्या नाही म्हणून सासू त्यांना शोधण्यासाठी घराबाहेर पडली. रात्री 9 वाजेच्या सुमारास एका विहिरीजवळ त्यांनी सरोज यांची चप्पल पाहिली तेव्हा त्यांना शंका आली. सासूने आरडा ओरडा करत गावकऱ्यांना एकत्र केले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आळी. पोलिसांनी तीन मुलांसह सरोज यांचा मृतदेह बाहेर काढला. मृतांमध्ये महिला सरोज तिचे दोन मुले विपिन (5) आणि नितीन (3) तसेच 14 महिन्यांची मुलगी दीप्तीचा समावेश आहे.
  2013 मध्ये झाले होते लग्न
  नातेवाईकांनी सांगितले की, सरोजचे लग्न 2013 मध्ये बबली बरोबर झाले होते. लग्नानंतर तिचा पती तिला दारु पिऊन मारहाण करत होता. माहेरचे लोक अनेकदा तिला माहेरी घेऊन गेले होते. पण काही दिवसांत नवरा माफी मागून तिला परत घरी आणायचा. पत्नी सरोजबरोबरच तो मुलांनाही मारहाण करायचा.

Trending