आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत बुडाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; दिंडोरी तालुक्यातील दुर्दैवी घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिंडोरी- तालुक्यातील कोऱ्हाटे येथे मनोज शिवाजी शिंदे (३७) या शेतकऱ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. कोऱ्हाटे येथील मनोज शिंदे हे सकाळी शेतातील विहिरीत वीजपंपाचा पाइप बांधण्यासाठी पत्नीसमवेत गेले होते. पाइप बांधत असताना पाय घसरून ते विहिरीत पडले. पत्नीने आरडाओरड केल्यानंतर शेतकऱ्यांनी विहिरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. 

 

शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिंडोरी पोलिसांत याबाबत नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूने शिंदे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

बातम्या आणखी आहेत...