आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या मारहाणीमध्ये जखमी वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पातूर- शहरातील भीमनगर येथे बाप लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली. प्राप्त माहितीनुसार भीमनगर येथील रहिवासी श्रीराम सुरवाडे (वय ७५ वर्षे) यांना दोन मुले व एक मुलगी अशी अपत्ये असून अरुण सुरवाडे हा मोठा मुलगा २३ सप्टेंबरच्या रात्री घरी आला. तुम्हाला जो निराधार भत्ता मिळतो त्यातील काही पैसे द्या, असे सांगून हुज्जत घालू लागला. काही वेळानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. 


मोठा मुलगा व सुनेने धक्का दिल्यामुळे श्रीराम सुरवाडे रस्त्यावर पडले. त्यांना जबर मार लागला. ते मुलाची तक्रार करण्याकरिता पोलिस स्टेशनला आले. तक्रार देऊन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवले होते. परंतु त्यांना जास्त त्रास होत असल्यानेे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे पाठवले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवार, २५ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला. 


श्रीराम सुरवाडे यांच्या मुलीने दिलेल्या माहिती नुसार मृतकाचा मुलगा हा पैशासाठी वडिलांना त्रास देत असे. तो एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत असे अशी माहिती दिली असून पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास पातूर पोलिस करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...