आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीत लग्नाच्या ७१ वर्षांनंतर एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - जर्मनीत ७१ वर्षांचे वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर ९४ वर्षीय  हर्बर्ट व ८८ वर्षांच्या मर्लिन फ्रान्सिस या दांपत्याने एकाच दिवशी या जगाचा निराेप घेतला. दोघांच्या मृत्यूमध्ये १२ तासांचा फरक हाेता. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार दाेघांची भेट ७२ वर्षांपूर्वी एका कॅफेत झाली हाेती. त्या वेळी हर्बर्ट हे २२ वर्षांचे, तर मर्लिन १६ वर्षांच्या हाेत्या. वर्षभर डेटिंग करून दाेघांनी लग्न केले. लग्नानंतर मर्लिन यांनी पतीसाेबत जर्मनीत सहा वर्षे घालवली. तसेच दुसऱ्या महायुद्धात लष्कराची सेवाही केली हाेती. हर्बर्ट यांनी कोरिया व व्हिएतनाममध्येही नाेकरी केली. दीर्घकाळ एकमेकांसाेबत राहून दाेघांचे गत शुक्रवारी निधन झाले. सोमवारी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.