आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी संवेदनांसोबत असा होतोय खेळ, डॉक्टरांनी रस्त्याच्याकडेला पडदा लावून केले पोस्टमॉर्टम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाडमेर (राजस्थान) हा फोटो गडरारोड सीएसची येथील आहे. गडरारोडच्या तामलोर गावात कंरट लागल्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पार्थिव मंगळवारी रात्री गडरारोड कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी पोस्टमॉर्टमनंतर पार्थिव नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. परंतु या दरम्यान लाजिरवाणे फोटो समोर आले आहेत. यामुळे सरकारच्या विकासाचे दावे फोल ठरले आहेत. कडरारोड सीएचसीमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पोस्टमॉर्टम कक्ष नाही. हॉस्पिटलच्या मागच्या रोडवरच उघड्यावर दोन महिलांचे पोस्टमॉर्टम करुन पोलिसांनी पार्थिवक कुटूंबियांच्या स्वाधिन केलं. 


नातेवाईकांनी विरोध करुनही ऐकले नाही 
रस्त्यावर पोस्टमॉर्टम करत असल्यामुळे नातेवाईकांनी विरोध केला. परंतु डॉक्टरांनी कक्ष नसल्याचे सांगत रस्त्यावरच पोस्टमॉर्टम केले. 


सिस्टमवर मोठा प्रश्न 
विकासाचे दावे करणारे नेते ग्रामिण भागात उपचाराची व्यवस्था करु शकत नाही. तामलोर येथे राहणा-या माया कंवर आणि राजों कंवर यांचा करंट लागल्यामुळे मृत्यू झाला. यानंतर रस्त्यावरच त्यांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...