आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये गर्भवतीचा स्वाइन फ्लूने मृत्यू; तीन दिवसांत स्वाइन फ्लूचे तीन बळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड शहर- तालुक्यातील वंजारवाडी येथील रुपाली बाळासाहेब शिंदे (वय २०) या सात महिन्यांच्या गर्भवतीचा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता नगर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. मागील तीन दिवसांत स्वाइन फ्लूने तिघांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात घबराट पसरली आहे. 


रुपाली शिंदे पुण्यात आपल्या कुटुंबीयांसमवेत रहात होती. गौरी-गणपतीसाठी ती गावी, वंजारवाडी येथे आली होती. सर्दी व खोकला झाल्याने तिला १५ सप्टेंबरला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्याने तिला १७ रोजी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती आणखी खालावत जाऊन तिचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. 


धूर फवारणी आवश्यक 
जामखेड शहरात स्वच्छता नाही. नगरपालिकेने तातडीने धूर फवारणी सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे. संबंधितांना सूचना दिल्या आहेत. धूर फवारणी यंत्रे दुरुस्त करून नवीन मोठे यंत्र तत्काळ खरेदी केले जाणार असल्याचे तहसीलदार तथा मुख्याधिकारी विशाल नाईकवाडे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...