आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीने लावले होते अमली पदार्थांचे व्यसन, मग सुरू केली ड्रग्सची तस्करी; घराबाहेर अशा अवस्थेत सापडला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुरी - शहरातील कृष्णपुरम कॉलनीत शनिवारी सकाळी घराच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली होती. कॉलनीतील लोकांनी पोलिसांना माहिती कळवताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी युवतीला पाहिले असती ती मरण पावली होती. शिवानी शर्मा असे युवतीचे नाव आहे. युवतीचे पोस्टमार्टम करण्यात आले असून स्मॅकचे (ड्रग्स) अतिसेवन केल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना याप्रकरणी 6 लोकांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. 


युवतीचा काकू सुनीता शर्माने सांगितले की, शिवानीचे वडील घनश्याम शर्मा यांचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. तिच्या मैत्रिणींनीच तिला स्मॅकची सवय लावून तिला या धंद्यात ढकलले. या संपूर्ण प्रकारात रावत दीवाण या पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. 


वडिलांचे झाले निधन, आई लहानपणीच सोडून गेलेली, आजीकडे राहत होते शिवानी: 
शिवानीचे पिता गांजाच्या अधिन होते. यामुळे दोन महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. तर जन्माच्या काही वर्षांनंतर तिची आई तिला सोडून निघून गेली होती. आजीने तिचा सांभाळ केला. इयत्ता आठवीपर्यंत खासगी शाळेत शिक्षण घेतले. पण वाईट संगतीला लागल्याने तिला आपल्या प्राणाला मुकावे लागले. 

 


सहा जणांवर खूनाचा गुन्हा दाखल

शिवानीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी दिवसभर चौकशी केली. अखेर रात्री उशिरा सहा जणांविरोधात खटला दाखल करण्यात आला. स्मॅकचा व्यवसायाशी निगडीत अनेक लोकांची पोलिस चौकशी करत आहेत. पोलिसांनी शिवानीची आजी लक्ष्मीबाई शर्मा यांच्या तक्रारीवरून गोलू रजक, विकास सोनी, रूबी, जूली, परमाल गौर, चिक्की पाठक यांच्याविरोधात साक्ष्य लपवणे आणि कलम 302 खून करणे अंतर्गक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी अनेक खुलासे होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

 


जूली, रूबी आणि पोलिस कर्मचारी शिवानीला गाडीवर घेऊन गेले होते - आजी

शिवानीची आजी लक्ष्मीबाई शर्मा यांनी सांगितले की, शु्क्रवार (दि.5) रोजी दुपारी जूली, रूबी आणि दीवान (पोलिस कर्मचारी) तिघेही शिवानीला बाइकवर बसवून घेऊन गेले. पण यानंतर तिचा काही पत्ताच लागला नाही. जूली शिवपुरीच्या राधारमण मंदिराजवळ राहते तर रूबी महाराणा प्रताप कॉलनी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. मयताच्या आजीने पोलिस दीवानचे नाव दिल्याने पोलिसही या प्रकरणाकडे संशयतरित्या पाहत आहेत. बदनामी होण्याच्या भीतीने संबंधित पोलिसाला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचे सुनीता शर्मा सांगत आहेत. 


सुनिता शर्माने सांगितले की, शुक्रवारी शिवानी घरी झोपली होती. दरम्यान रूबी आणि जूली आल्या आणि शिवानीला आपल्यासोबत नेले. या लोकांची संपूर्ण टोळी आहे. यामध्ये चिक्की, विकास, छोडू आणि दोन मुस्लिम मुलांचा समावेश आहे. हे सर्व ड्रग्स घेतात आणि ते विकतात. माझ्या पुतणीला याच लोकांनी बिघडवले होते. शिवानीने आपला 30 हजार रुपयांचा मोबाइल हवाई पट्टीसमोर राहणाऱ्या एक मुस्लिम मुलाकडे गहाण ठेवला होता. 

 

चिक्कीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून स्मॅकची सवय लावली, जूली करत होती विक्री, पोलिस कर्मचारीही सहभागी

शिवानीच्या आत्येभाऊ दीपू शर्माचे म्हणणे आहे की, शिवानीच्या गहाण ठेवलेल्या मोबाइलबाबत जूलीने त्याला धमकी दिली होती. मोबाइल माझ्या आईच्या नावाने फायनान्स केल्याचे मी सांगितले होते. पण जूलीने मला 10 ते 20 ग्रॅमसोबत पोलिसांत जाळ्यात अडकवण्याची मला धमकी दिली. दीपू पुढे म्हणाला की, नवाब साहेब रोड हनुमान मंदिरासमोरील एका मेडीकल स्टोअरमध्ये उघडपणे एव्हिलच्या इंजेक्शनची विक्री होते. दीपूने शिवानीच्या लग्नासाठी एक मुलगा पाहिला होता. पण तिने दो दिवसांपूर्वीच चिक्कीसोबत प्रेमविवाह केला होता.