आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागपूर : नियमित परिचारिका कुटुंब नियोजन शिबिरात असल्यामुळे कंत्राटी परिचारिकेने केलेल्या बाळंतपणात जुळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी नवेगाव आरोग्य उपकेंद्रात घडली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुमन गणेश सोनुले असे या मातेचे नाव असून, तिचे हे दुसरे बाळंतपण होते, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. किरण वानखेडे यांनी दिली.
२८ सप्टेंबरला सोनोग्राफी केली असता १७ डिसेंबर ही प्रसूतीची तारीख आली. ७ आॅक्टोबरला सुमन गणेश सोनुले यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८ आॅक्टोबरला त्यांच्या सासू लीलाबाई यांनी डाॅक्टरांचे न ऐकता त्यांना घरी नेण्याचा हट्ट धरला. त्या वेळी त्यांच्याकडून संमतीपत्र लिहून घेण्यात आल्याचे डाॅ. किरण वानखेडे यांनी सांगितले. ११ आॅक्टोबरला सकाळी ६ वाजता कळा सुरू झाल्याने त्यांना साडेसात वाजताच्या सुमारास नवेगाव आरोग्य उपकेंद्रात आणण्यात आले. तेथे कंत्राटी परिचारिका वैशाली कोहळे यांनी प्रसूती केली. त्यात जुळे मरण पावले. नियमित परिचारिका तोरे यांची अहेरी येथील कुटुंब कल्याण शिबिरात ड्यूटी असल्याने त्या तिथे नव्हत्या. त्यामुळे कंत्राटी परिचारका वैशाली कोहळे यांनी सुमन कोहळे यांचे बाळंतपण केले. मात्र, यात जुळ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णालयात बराच वेळ गोंधळ घातला. काही वेळानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर सर्वजण शांत झाले.
नातेवाइकांकडून कारवाईची मागणी
साधारणत: पहिल्या प्रसूतीत १२ तास तर दुसऱ्या प्रसूतीत सहा तासांचा लेबर पेन होतो. पण, या प्रकरणात सुमन गणेश सोनुले यांना रात्रीच कळा सुरू झाल्या असाव्या. परंतु नातेवाइकांनी सकाळपर्यंत वाट पाहून भरती केले असावे. या विलंबामुळे जुळ्यांचा गर्भातच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डाॅ. किरण वानखेडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, कंत्राटी परिचारकेने बाळंतपण केल्याने सुमनचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला. तसेच संबंधित परिचारिकेविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.