आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी घेताना नाव उलटली, दोन अल्पवयीनांचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील मांगली गावची घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकुटबन- झरी तालुक्यातील मांगली येथील प्रख्यात मोहरमच्या उत्सवात सहभागी होऊन नदी मार्गे परत जात असताना नावामध्ये सेल्फी घेण्याचा नादात नाव उलटून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजता दरम्यान घडली असून मृत तरुण तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती आहे.   


मांगलीमध्ये मुस्लिम आणि हिंदू समुदाय मागील अनेक वर्षांपासून एकत्रितपणे मोहरमचा सण साजरा करतात. यासाठी परिसरातील गावासह सीमेलगत तेलंगणा राज्यातील गावातील लोकसुद्धा पैनगंगा नदी पार करून मांगलीत येतात. गुरुवारीसुद्धा मोहरमनिमित्ताने तेलंगणातील आदिलाबाद येथून ५ युवक आले होते. ते सकाळी राजूर (गोटा) गावाजवळील नदी घाटावर पोहाेचले आणि नदी किनाऱ्यावर ठेवून असलेल्या लाकडी नावेत बसून पाण्यात गेले. नदी पात्रात पोहाेचल्यावर तरुणांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. सेल्फी काढत असताना नाव उलटून पाचही मित्र पाण्यात पडले. त्यापैकी दोघांना पोहता येत असल्याने ते नदीबाहेर आले. मात्र, अन्य तिघे पाण्यातच अडकले. याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. बुडत असलेल्या तिघांनाही तत्काळ बाहेर काढून मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्यापैकी शेख अर्शद (१४) व सफिर सिराज (१६) यांना मृत घोषित केले. तर, सय्यद उमेद अजिम याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला आदिलाबाद येथे हलवले.

बातम्या आणखी आहेत...