आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

36 वर्षांपूर्वीच्या एका खटल्यातील दोषी; इलेक्ट्रिक खुर्चीवर बसवून मृत्युदंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या टेनेसीमध्ये ३६ वर्षांपूर्वीच्या एका खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या दोषीला विजेचा धक्का देऊन ठार करण्यात आले. कडक सुरक्षा व्यवस्थेत ६१ वर्षीय डेव्हिड अर्ल मिलरला गुरूवारी इलेक्ट्रिक खुर्चीवर बसवून मृत्युदंड देण्यात आला.

 

२० मे १९८१ रोजी २३ वर्षीय की ली स्टँडिपर या तरुणीला मारहाण करून सुरी मारून हत्या झाली होती, असा मिलरवर आरोप होता. तो सिद्ध झाल्यानंतर या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. हत्या केल्यानंतर मिलरने तरुणीचा मृतदेह पादरीच्या घराजवळ लपवून ठेवला होता. वास्तविक पादरीने त्यास आश्रय दिला होता.वास्तविक मिलर स्टँडिपरला डेटवर घेऊन गेला होता. मिलरला मानसिक आजार झाला होता, असा दावा करण्यात आला आहे. मिलरवर १९८० च्या दशकात लैंगिक अत्याचार झाला होता. दोन महिन्यातील दुसरे प्रकरण अमेरिकेत इलेक्ट्रिक खुर्चीवर विजेचा धक्का देऊन मृत्युदंडाची अंमलबजावणी करण्याची ही दोन महिन्यातील दुसरी वेळ आहे. 

बातम्या आणखी आहेत...