आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूदंड अटळ असतानाही या क्रूरकर्माने केली आत्महत्या; धक्कादायक होती शेवटची इच्छा, तरीही कोर्टाने केली पूर्ण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील सर्वात कुख्यात खूनींपैकी एक स्कॉट डोझिअरने (48) तुरुंगातच आत्महत्या केली. विशेष म्हणजे, त्याला मृत्यूदंड अटळ होता. तरीही दुसऱ्यांच्या हातून जीव देण्याऐवजी त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला. प्रत्यक्षात त्याला आपल्याच कृत्यांबद्दल स्वतःची किळस आली होती. जेलमध्ये राहून मृत्यूदंड मिळण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा मी आपले आयुष्य खुद्द संपवेन असे तो लिहून गेला. ब्रिटिश दैनिक द मिररने त्याच्या मरण्यापूर्वी घेतलेली मुलाखत, त्याची शेवटची इच्छा यासंदर्भात वृत्त जारी केले. त्याची शेवटची इच्छा धक्कादायक होती आणि विशेष म्हणजे, कोर्टाने ती मान्य देखील केली.


एकाचे हातोड्याने डोके फोडले, तर दुसऱ्याच्या मृतदेहाचेही केले तुकडे...
> स्कॉट एक अट्टल गुन्हेगार आणि अमली पदार्थांचा तस्कर होता. त्याने 2002 मध्ये आपल्याच टोळीतील 2 सहकाऱ्यांची निर्घृण हत्या केली. त्यावेळी 32 वर्षांचा राहिलेल्या स्कॉटने आपला मित्र जेरेमिया मिलर (22) याचा शिरच्छेद केला. यानंतर त्याचे शिर, हात, पाय धडावेगळे करून तुकड्यांमध्ये तो मृतदेह बॅगेत भरला आणि कब्रस्तानात काँक्रीटच्या कबरीत पुरला. यानंतर 26 वर्षीय ग्रिफिनला गोळ्या घालून ठार मारले. त्याचा मृतदेह पोलिसांना नेवाडा प्रांतात अतिशय विक्षिप्त अवस्थेत सापडला होता. मृतदेहाची अवस्था पाहून त्याचे डोके हातोड्याने फोडल्याचे वाटत होते.
> त्याच वर्षी नेवाडा पोलिसांनी स्कॉटला खून, अमली पदार्थ आणि इतर गंभीर आरोपांमध्ये अटक केली. कित्येक वर्षे खटला सुरू होता. 2012 पासून त्याने वकील घेण्यास किंवा आपली बाजू मांडण्यास सुद्धा नकार दिला. त्याला कोर्टाने मृत्यूदंड सुनावला. परंतु, स्कॉटने त्याचा काहीच विरोध केला नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून तो खूनी, बलात्कारी आणि दरोडेखोरांसोबत विशेष सुरक्षा असलेल्या तुरुंगात कैद होता. मित्रांचा खून करून त्याला स्वतःची किळस वाटत होती.


अंतिम इच्छा कोर्टाने केली पूर्ण
- इतकी वर्षे तुरुंगात राहिलेल्या स्कॉटबद्दल लोक-माध्यमांना उत्सुकता होती. त्याने पत्रकारांशी संवाद साधून काही मोजक्या मुलाखती देखील दिल्या. आत्महत्या करण्याच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी त्याने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, तो स्वतःचे आयुष्य संपवणार याची कुणालाही कल्पना नव्हती.
- मृत्यू झाल्यानंतर आपला मेंदू संशोधकांना देण्यात यावा अशी त्याची इच्छा होती. जेणेकरून शास्त्रज्ञ त्याच्या मेंदूचा अभ्यास करून कुख्यात खूनींच्या डोक्यात नेमके काय चालते याचा पत्ता लावू शकतील. क्रूरकर्मांचा मेंदू आणि त्यातील केमिकल इतरांपेक्षा वेगळे असतात का हे जगाला कळेल असे त्याचे म्हणणे होते. स्कॉटच्या इच्छेनुसार, त्याचा मेंदू शास्त्रज्ञांना देण्यात आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...