आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - १९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगल प्रकरणात दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने दोन जणांच्या हत्येचा दोषी यशपाल सिंहला फाशीची शिक्षा सुनावली आहे. घटनेच्या ३४ वर्षांनी या प्रकरणातील ही पहिलीच फाशीची शिक्षा आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजय पांडे यांनी दुसरा दोषी नरेश सेहरावतला जन्मठेप सुनावली.
दिल्ली पोलिसांनी १९९४ मध्ये पुराव्यांच्या अभावी हे प्रकरण गुंडाळले हाेते. नंतर दंगलींचा तपास करणाऱ्या एसआयटीने ते पुन्हा सुरू केले. सुरक्षा व दोषींवर दिल्ली कोर्टात झालेल्या हल्ल्यांमुळे हा निकाल तिहार तुरुंगात सुनावण्यात आला. कोर्टाने १४ नोव्हेंबरच्या सुनावणीत यशपाल व नरेशला १९८४ मधील दंगली प्रकरणी हरदेवसिंह व अवतार यांच्या हत्येचा दोषी ठरवले हाेते.
एसआयटीकडून पुन्हा तपास झाल्यानंतर शिक्षा सुनावल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.
२८०० शिखांची हत्या
दिल्लीत शीखविरोधी दंगलीचे ६५० गुन्हे दाखल झाले होते. पैकी २६७ प्रकरणे दिल्ली पोलिसांनी पुराव्यांअभावी बंद केली होती. एसआयटीने ५ केसच्या फायली पुन्हा उघडल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर २८०० शिखांची हत्या झाली होती. पैकी २१०० शीख दिल्लीतच मारले गेले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.