आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Debate Between The Soldier And His Wife On The Occasion Of Karavachoth, Wife Found Dead

पत्नीने करवा चौथला पतीकडे केला दागिन्यांसाठी हट्ट.. बेडरूममध्ये आढळला तिचा मृतदेह, सुटीवर घरी आला होता सैनिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलंदशहर - येथील नरौरा परिसरात एका महिलेचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. लायसन्सी पिस्तुलाने तिला गोळी घालण्यात आली आहे. सैनिकाचा पत्नीबरोबर वाद झाला होता, त्यानंतर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिस सध्या या प्रकरणामध्ये हत्या झाली की आत्महत्या या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत. 


हा सानिकल जम्मूच्या सांबामध्ये तैनात होता आणि सुटीसाठी घरी आलेला होता, असे सांगण्यात येत आहे. सैनिकाच्या पत्नीने त्याच्याकडे करवा चौथच्या सणासाठी दागिण्यांची मागणी केली होती. त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर बेडरूममध्ये पत्नीचा मृतदेह आढळला. ज्या पिस्तुलातून गोळी चालवण्यात आली ते सैनिकाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी महिलेच्या माहेरी याबाबत माहिती दिली. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करून आत्महत्येच्या प्रकरण असल्याची शक्यता व्यक्त करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...