Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Debate on farming; father's deadly attack on his wife along with his son

शेतीच्या वाटणीवरून वाद; वडिलाचा मुलासह पत्नीवर प्राणघातक हल्ला

प्रतिनिधी, | Update - Jul 15, 2019, 08:01 AM IST

घटनेनंतर तिघेही हल्लेखोर फरार , अद्याप गुन्हा दाखल नाही

  • Debate on farming; father's deadly attack on his wife along with his son

    हिंगोली - तालुक्यातील भांडेगाव येथे शेत वाटणीच्या वादावरून एका शेतकऱ्याने मुलासह पत्नीवर कुऱ्हाड व विळ्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून दोन्ही गंभीर जखमींना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


    रामप्रसाद ऊर्फ बंडू महादेव गिरी आणि विजयमाला महादेव गिरी अशी जखमींची नावे आहेत. महादेव यांना दोन बायका असून त्यांना तीन अपत्ये आहेत. ते आपल्या दुसऱ्या पत्नीसमवेत मालगाव येथे वास्तव्यास आहेत. तर विजयमाला आणि रामप्रसाद हे भांडेगाव येथे शेती करतात. त्यांच्याकडे एकूण १२ एकर शेती असून महादेव ज्या पत्नीसोबत राहताे त्या पत्नीची मुले ती संपूर्ण शेती आमची असल्याचा दावा करत आहेत. हा वाद मागील ३ ते ४ वर्षांपासून सुरू आहे. तर भांडेगाव येथे वास्तव्यास असलेला रामप्रसाद त्याच्या वाट्याला येईल ती शेती घेण्यास तयार असल्याचे त्याच्या वडिलाला सांगत आला आहे. मात्र आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वडील आणि दोन सावत्र भाऊ अचानक शेतामध्ये येऊन त्यांनी रामप्रसाद आणि विजयमाला यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला एवढा गंभीर होता की धारदार विळा रामप्रसादच्या पोटामध्ये खुपसला होता. तर विजयमाला यांच्या पायावरही कुऱ्हाडीचे वार करण्यात आले. या घटनेत दोघे मायलेक गंभीर जखमी होऊन जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेनंतर हल्लेखोर तिघेही फरार झाले. जखमींनी आरडाओरड केल्याने परिसरात शेतकाम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना उपचारासाठी हिंगोलीत हलवले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करून नांदेड येथे रेफर करण्यात आले असून याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Trending