आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घटस्फोट देणाऱ्या दांपत्यांमध्ये श्वानाच्या मालकीवरून वाद

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत पाळीव प्राण्यांना कुटुंबाचा सदस्य मानण्याचा कायदा
  • ८०% लोक कुत्र्यासोबत घरातील लोकांसारखा व्यवहार करतात

मेलिसा चान- अमेरिके मध्ये घटस्फोट घेणाऱ्या विवाहित जोडप्यांमध्ये एक नवा वाद सुरू आहे. घरात वाढलेल्या श्वानाच्या (पेट्स)मालकी हक्काने जटील कायद्याच्या लढाईचे रूप घेतले आहे. काही खटल्यांमध्ये तर दीर्घकाळ मीडियामध्ये ठळक बातम्या प्रसिद्ध झाल्या अाहेत. वकिलांचे म्हणणे आहे, हे वाद जास्त वाढताहेत. कारण राज्यातील न्यायालयांना अशा कायद्यांचा अभ्यास करावा लागत आहे. ज्यात कुत्रे, मांजरीसह अन्य पाळीव प्राण्यांच्या संबंधात कोणतीही तरतूद नाही. 

मागील ३ वर्षांत तीन राज्यांनी आपल्या घटस्फोट कायद्यांमध्ये बदल केले आहे. त्यानुसार पेट्सना 
सोफा, टेलिव्हिजनसारख्या वस्तुंसारखे समजण्याऐवजी कुटुंबाचा सदस्य मानावे. रोडे आइलँड, पेनसिल्वेनिया आणि वाॅशिंग्टन डीसी मध्ये अशा विधेयकांवर विचार होत आहे. घटस्फोटांच्या केसेस लढवणारे  वकील म्हणतात, पेट्सचे हिस्सेवाट्यांच्या खटल्यांचा निपटारा न्यायालयाला करणे शक्य होत नाही. २०१३ मध्ये न्यूयॉर्क काउंटी सुप्रीम कोर्टात एका दांपत्यामधील डॅशुंड जातीच्या छोट्या कुत्र्याचा वाद आला होता.  कोर्टानेे टिप्पणी केली की पेट्सविषयी समाजात बदल पाहिल्यानंतर अशा घटना वाढत आहेत. न्यायाधीश मॅथ्यू कुपर यांनी लिहिले आहे की, आपल्या कुत्र्यांशी अनेक लोकांचे प्रेम नेहमीसाठी असते. ही गोष्ट सर्व विवाहित दांपत्याविषयी म्हणता येणार नाही. १८९७ मध्ये अमेरिकी सुप्रीम कोर्टाने म्हटले होते,  पाळीव कुत्रे व्यक्तिगत संपत्ती आहे. कुत्र्यांचा उपयोग त्यांच्या मालकांसाठी  ब्रीडिंग आणि अन्य कामांतून पैसे कमवणे होते.  मिनेसोटामध्ये पारिवारिक खटल्यांचे वकील बारबरा गिसलासन यांनी म्हटले, ते आता काम करणाऱ्या पशुंपासून आपले सहकारी झाले आहे.  अमेरिकी व्हेटर्नरी मेडिकल असोसिएशन (एवीएमए)च्या एका सर्वेनुसार आता ८० टक्के मालक पेट्सला आपल्या परिवाराचा सदस्य मानतात. स्टोर वा ब्रीडरकडून खरेदी करण्याऐवजी बहुतेक लोक  अाश्रय स्थळ, मित्र, नातेवाइकांकडून कुत्रे आणि  मांजरी घेतात. 


न्यू ओरलिएंसमध्ये २००५ मध्ये आलेल्या वादळातून वाचलेल्या लोकांच्या सर्वेतून माहित झाले की ४४ टक्के लोकांनी पेट्समुळे वादळाच्या आधी सर्व भाग रिकामा करून ठेवला. त्यानंतर २००६ मध्ये केंद्र सरकारने एका कायद्यात घटनास्थळापासून बाहेर काढण्याच्या योजनेत  पेट्स आणि अन्य उपयोगी
पशूंना सहभागी करण्याचा उल्लेख केला होता.  
 

६५ % कुटुंबांजवळ पाळीव प्राणी
 
अमेरिकेत आज ५६.८ % ते  ६५ % परिवारांनी पेट्स पाळले आहे.  पेट्स ठेवणाऱ्यांमध्ये  युवकांची संख्या अधिक आहे. २०१८ मध्ये  टीडी अमेरिट्रेडच्या एका सर्वेत ११३९ युवा पेट मालकांपैकी लवळपास ७०% लोक म्हणाले, ते  अापल्या नव्या पेटसाठी आवश्यकता पडल्यानंतर  कामापासून सुट्टी घेऊ शकतात. जवळपास ८० टक्के  महिला आणि  ६०% पुरुष म्हणाले, ते  पेटला ‘बेबी फर’ मानतात.  २०१८ मध्ये २० लाखापेक्षा अधिक पेट्सचा आरोग्य विमा काढला. २०२८ पर्यंत व्हेटर्नरी चिकित्सकांची संख्या २०% वाढेल.